Gunaratna Sadavarte | राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा आता कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. दुसरीकडे महायुतीमधील अनेक नेते हे मविआमध्ये प्रवेश करत आहेत. मविआमधीलही काही नेत्यांची महायुतीकडे वाटचाल दिसून येत आहे. अशातच आता ठाकरे गटाला एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. (Gunaratna Sadavarte)
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांना आता आव्हान दिलं आहे. “मी वरळीतून निवडणूक लढवणार आणि आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार”, असा निर्धार सदावर्ते यांनी केलाय.
गुणरत्न सदावर्ते वरळीतून लढणार
त्यांनी आज (3 ऑक्टोबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. “आदित्य ठाकरे यांना वरळीत धूळ चारण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे. मी ज्या विचारांच्या लोकांसाठी काम करत आहे, त्यांच्यापर्यंत मी माझ्या भावना पोहोचवल्या आहेत. मी जर वरळीतून लढलो, तर 25 हजाराहून अधिक मताधिक्याने लीड घेईन.”, असा विश्वास देखील सदावर्ते यांनी व्यक्त केलाय. (Gunaratna Sadavarte)
तसेच आदित्य ठाकरे यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील सदावर्ते यांनी दिला आहे. पुढे त्यांनी म्हटलं की, “मी शरद पवारांना घाबरलो नाही, मी कधी ठाकरेंना घाबरलो नाही. त्यांना असं उडवून लावलं. त्यामुळे महायुती माझा विचार नक्कीच करेल. वरळीतील जिजामाता नगरमध्ये असलेल्या 8000 झोपडीवासियांचा मी विकास करेन. त्यांना 600 स्क्वेअर फुटाचे घर देणार”, अशी घोषणा देखील सदावर्ते यांनी केली आहे.
‘शिवनेरी सुंदरी’ योजनेवरही भाष्य
यावेळी त्यांनी शिवनेरी सुंदरी योजनावर देखील भाष्य केलं. “भरत गोगावले यांना इतकंच सांगेल की, एसटी महामंडळामध्ये त्यांना क्रांती करायची असेल, तर त्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा. त्यांनी आमच्या महिला भगिनींना न्याय द्यावा. त्यामुळे शिवनेरी सुंदरी ही योजना न काढता त्यांनी माता रमाई ही योजना काढावी. महिलांना सशक्त बनवावे”, असे गुणरत्न सदावर्ते(Gunaratna Sadavarte) यांनी म्हटले आहे.
News Title – Gunaratna Sadavarte Fight election from worli
महत्त्वाच्या बातम्या-
नवरात्रीत चार खास राजयोग, ‘या’ 3 राशींना देवी करणार धनवान!
नवरात्रीत सोन्याने दाखवला दरवाढीचा रंग, जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर
विधानसभेपूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी?, शिंदे गटाच्या मंत्र्याचा थेट भाजपला इशारा
आजपासून नवरात्रीला सुरुवात, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त व पूजेची पद्धत
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी






