Gujarat Titans l आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) अचानक गुजरात टायटन्समधून माघार घेतल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 28 वर्षीय फिलिप्सने (Glenn Phillips) यंदाच्या आयपीएल हंगामात टायटन्सकडून (Gujarat Titans) एकही सामना खेळलेला नाही. मात्र, तरीही त्याची अचानक टीममधून एक्झिट ही अनेकांच्या शंकेचा विषय बनला आहे. ग्लेन फिलिप्सच्या जाण्याचे खरे कारण अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेले नसले तरी, त्याला दुखापत झाल्याची चर्चा जोरात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील चमकदार कामगिरीनंतर आयपीएलची निवड :
ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडसाठी दमदार खेळ केला होता. भारताविरुद्ध उपविजेता ठरलेल्या किवी संघासाठी फिलिप्सने फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अशा तिन्ही विभागात योगदान दिले. त्यामुळे आयपीएल लिलावात त्याला 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) खरेदी केले होते.
त्याच्या स्फोटक फलंदाजी आणि अव्वल दर्जाच्या झेलांनी प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. विशेषतः पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने घेतलेला एकहाती झेल आणि दुबईतील काही महत्त्वाचे क्षण आजही चर्चेत आहेत. त्यामुळे IPL मध्येही त्याच्याकडून अशीच कामगिरी होईल, अशी अपेक्षा होती.
Gujarat Titans l टायटन्सकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा नाही :
ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) अद्याप टायटन्ससाठी एकही सामना खेळलेला नसताना त्याची टीममधून एक्झिट ही अनेक प्रश्न निर्माण करणारी बाब आहे. सध्या त्याच्या जागी बदली खेळाडू घेतला जाईल का, यावर टायटन्स फ्रँचायझीने अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शनिवार (12 एप्रिल) रोजी होणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यातही तो संघात दिसणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचेही समजते. फिलिप्सची दुखापत गंभीर आहे की तो अन्य काही कारणास्तव बाहेर गेला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.






