पुण्यात GBS चा धोका वाढला! रुग्णसंख्या शंभरीपार; 16 जण व्हेंटिलेटरवर

On: January 27, 2025 12:26 PM
Pune News
---Advertisement---

Pune News l पुण्यात GBS (Guillain Barre Syndrome – GBS) या आजाराने चिंता वाढवली आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्या शंभरीपार (More than 100) गेली आहे.

आठवड्याभरातच पुण्यातील गुईलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या १०१ वर पोहोचली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

सध्या १६ गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्ण व्हेंटिलेटरवर (Ventilator) असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यात एकाच दिवसांत २८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागातर्फे (Health Department) २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण (Survey) करण्यात आले आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६८ पुरुष आणि ३३ महिला आहेत.

Pune News l गुईलेन बॅरी सिंड्रोममुळे राज्यातला पहिला मृत्यू :

गुईलेन बॅरी सिंड्रोममुळे राज्यातील पहिला मृत्यू (First Death) झाल्याची नोंद झाली आहे. एका ४० वर्षीय व्यक्तीचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यातील धायरी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या या व्यक्तीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली होती.

त्यानंतर त्याला उपचारासाठी सोलापुरातील (Solapur) एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

News Title: guillain-barre-syndrome-cases-increase-in-pune-16-patients-on-ventilator

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now