पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; पुण्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चं थैमान, नेमका आजार काय?

On: January 21, 2025 11:20 PM
Pune News
---Advertisement---

Pune News l पुणे (Pune) शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) (जीबीएस) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल (Neurological) आजाराचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या मज्जातंतूच्या (Nerve) स्त्रावातून घेतलेले नमुने आयसीएमआर-एनआयव्ही (ICMR-NIV) कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरातील पेशंट दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (Dinanath Mangeshkar Hospital) आणि पूना हॉस्पिटल (Poona Hospital) येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्यानंतर, पुणे महानगरपालिकेकडे (Pune Municipal Corporation) (पीएमसी) गुइलेन बॅरे सिंड्रोमची (Guillain-Barré Syndrome) किमान २२ संशयित प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) : एक दुर्मिळ आजार :

गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) हा एक दुर्मिळ आजार असून दरवर्षी एक लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला होतो. या आजाराचे निदान गुंतागुंतीचे असते. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि पाठीच्या कण्यातील द्रवाच्या (Spinal Fluid) चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी (IVIG) अथवा प्लाझ्मा एक्स्चेंज (Plasma Exchange) सारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले तरी, २० टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात.

तज्ज्ञ समिती स्थापन करणार :

गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) हा आजार इतर आजारांची लागण झाल्यावर प्रामुख्याने होतो. कमरेखालील भागाला लकवा (Paralysis) मारण्यापर्यंत या आजाराचे गांभीर्य पोहोचू शकते. या सर्व शक्यतांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

घाबरण्याचे कारण नाही :

जगभरात जीबीएस (GBS) नावाने वैद्यकीय क्षेत्रात माहिती असलेला हा आजार दर एक लाख लोकांमागे एका व्यक्तीला होतो. मात्र अचानक या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने लोक घाबरले आहेत. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, या आजाराची लक्षणं आढळली तर रुग्णांनी तात्काळ डॅाक्टरांना दाखवावे, असं आवाहन नांदेड सिटीतील कोरडेबाग येथील वर्पे क्लिनिकच्या (Varpe Clinic, Nanded City) डॅा. अश्विनी पाटील-वर्पे यांनी केलं आहे.

दरम्यान, सार्स कोव्हिड (SARS-COVID) सारख्या संसर्गजन्य रोगांचे रुग्ण आधी पुण्यातच आढळून आले होते. आता जीबीएसने (GBS) नवी धास्ती निर्माण केली होती पण वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीने भीतीचे वातावरण निवळायला मदत होईल.

News Title : Guillain-Barré Syndrome Cases in Pune

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now