नांदेडकरांचा मुंडे बंधू-भगिनींना विरोध; पंकजा आणि धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली

On: January 17, 2025 6:56 PM
Guardian Minister Appointment  Opposition to Munde siblings for Nanded district
---Advertisement---

Guardian Minister Appointment | बीडमधील (Beed) संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे (Murder) प्रकरण राज्यभर गाजत आहे. या हत्येच्या कटात (Conspiracy) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Valmik Karad) याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (Guardian Minister Appointment)

अशातच, महायुती सरकारमधील (Mahayuti Government) पालकमंत्रिपदाच्या (Guardian Minister) नियुक्त्या (Appointments) लवकरच जाहीर होणार आहेत. यात मंत्री मुंडे बंधू-भगिनींना (Munde Siblings) कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार याची उत्सुकता आहे.

नांदेडमध्ये मुंडे बंधू-भगिनींना विरोध

दरम्यान, नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मंत्री मुंडे बंधू-भगिनी नको, अशी आक्रमक भूमिका सकल मराठा समाजाने (Sakal Maratha Samaj) घेतली आहे. “नांदेडचा बीड करायचा नाही”, असा टोला मराठा समन्वयक (Maratha Coordinator) श्याम वडजे पाटील (Shyam Wadje Patil) यांनी लगावला आहे.

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मंत्री मुंडे बंधू-भगिनींना देण्यास सकल मराठा समन्वयकांनी विरोध दर्शवला आहे. तसा इशाराच या मराठा समन्वयकांनी दिला आहे. बीडमधील मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये १८ जानेवारीला मोर्चाचे (Morcha) आयोजन करण्यात आले होते. परंतु, वाल्मिक कराड याच्या ‘एसआयटी’ (SIT) कोठडीमुळे हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

“नांदेडचा बीड होऊ देणार नाही”

“नांदेड मराठवाड्यातील (Marathwada) सांस्कृतिक राजधानी (Cultural Capital) आहे. राज्यातील बीड जिल्ह्याचा बिहार (Bihar) झाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तिथल्या गुन्हेगारीचे (Criminality) अनेक किस्से समोर येत आहेत. त्यामुळे आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचा नाही. बीडची संस्कृती नांदेडमध्ये रुजू नये, म्हणून राज्य सरकारने बीडचे मंत्री मुंडे बंधू-भगिनींना नांदेडचे पालकमंत्रीपद देऊ नये”, अशी मागणी मराठा समन्वयक श्याम वडजे पाटील यांनी केली आहे. (Guardian Minister Appointment)

खासदार चव्हाणांची भूमिका

दरम्यान, नांदेडचे नेते भाजपचे (BJP) खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शिर्डीत (Shirdi) भाजपच्या महाविजय अधिवेशनात (Mahavijay Adhiveshan) मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नांदेडच्या पालकमंत्रिपदावर (Guardian Ministership) मत व्यक्त केले होते.

अशोक चव्हाण यांनी, “तो फार मोठा विषय नाही”, असे एका वाक्यात प्रतिक्रिया देत विषय संपवला होता. खासदार चव्हाण यांची भूमिका आणि सकल मराठा समाज समन्वयकांची भूमिका याबाबत वेगवेगळी दिसते.

मुंडे बंधू-भगिनींना पालकमंत्रिपद मिळणार?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लवकरच पालकमंत्रिपदाच्या घोषणा होणार असल्याचे जाहीर केले आहे. यात मंत्री मुंडे बंधू-भगिनींना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळणार याची चर्चा आहे.

बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तापलेले वातावरण पाहता, तिथे मुंडे बंधू-भगिनींना पालकमंत्रिपदावर संधी मिळणे, सध्या तरी अवघड असल्याचे चित्र आहे. महायुतीमधील नेते मंत्री मुंडे यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Guardian Minister Appointment)

Title : Guardian Minister Appointment  Opposition to Munde siblings for Nanded district
महत्वाच्या बातम्या- 

भाच्यानं आपल्या मामीलाच पटवलं, मामाला कळालं तेव्हा घडला मोठा अनर्थ

आठव्या वेतन आयोगाला मंजुरी; अर्थव्यवस्थेवर नेमका काय होणार परिणाम?

“मी सैफ अली खान आहे, लवकर…”; ऑटो ड्रायव्हरने सांगितली ‘त्या’ रात्रीची कहाणी

मित्रासोबत फिरताना पाहिलं आणि डोकं फिरलं, पुढे घडला भयंकर प्रकार

क्रिकेटर रिंकू सिंगनं उरकला साखरपुडा; होणारी बायको आहे खासदार

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now