नवीन GST लागू तरी दुकानदार लूट करतायेत? तर अशाप्रकारे करा तक्रार

On: September 24, 2025 12:30 PM
GST Rate Cut 2025
---Advertisement---

GST Update | गुड्स अँड सर्विस टॅक्स (GST) लागू झाल्यापासून दररोजच्या वस्तूंवरच्या कर रचनेत सातत्याने बदल होत आहेत. २२ सप्टेंबरपासून सरकारने GST मध्ये मोठा बदल केला असून दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू आता स्वस्थ झाल्या आहेत. यामध्ये २२ टक्के आणि २८ टक्के स्लॅब रद्द करून फक्त ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या किंमतीत कपात जाहीर केली आहे आणि नवीन किंमती बाजारात लागू केल्या आहेत. ज्यामुळे दुकानदारांकडून ग्राहकांना बदललेल्या किमतीत वस्तू मिळणे अपेक्षित आहे. मात्र, काही ठिकाणी ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत की, काही दुकानदार अजूनही जुन्या किंमतीत वस्तू देत आहेत. अशावेळी ग्राहकांकडे तक्रार करण्याचा मार्ग उपलब्ध आहे.

दुकानदारांनी नवीन किंमतीत वस्तू न दिल्यास कशी आणि कुठे तक्रार करायची? :

सरकारने स्पष्ट केले आहे की नवीन जीएसटी (GST) चे दर हे केवळ नवीन स्टॉक वरच नाही,  तर जुन्या साठवणुकींवरही लागू होणार आहेत. म्हणजेच दुकानदार ‘जुना स्टॉक असल्याने, जुनीच किंमत आहे’ असे सांगून  ग्राहकांची फसवणूक करू शकत नाहीत. जर दुकानदार असे करत असेल तर तो चुकीचा ठरतो.

अशावेळी ग्राहक थेट तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक १८००-११-४००० उपलब्ध आहे. तसेच, सीबीआयसीच्या जीएसटी (GST) हेल्पलाइनवर १८००-१२००-२३२ वर संपर्क साधता येईल. याशिवाय, नॅशनल अँटी प्रॉफिटीअरिंग अथॉरिटी (NAA) च्या वेबसाईटवरही ऑनलाइन तक्रार नोंदवता येते.

GST Update | ग्राहकांनी आपल्या हक्कांसाठी तक्रार नोंदवणं गरजेचं :

ग्राहकांनी खरेदीच्या वेळी पावती घेणे महत्त्वाचे आहे. पावतीतील दर आणि लागू असलेला जीएसटी (GST) स्पष्ट पहावा. जर नवीन दर असूनही जास्त दर आकारण्यात आला, तर तक्रारीला अजूनच प्रबळता मिळेल. सरकारने ग्राहकांना जागरूक राहण्याचे आणि फसवणूक झाल्यास योग्य ठिकाणी आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.

जीएसटी मधील बदलांमुळे ग्राहकांना वस्तू कमी दरात मिळाव्यात, हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे दुकानदारांनी नफा मिळवण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करणे हे बेकायदेशीर आहे. ग्राहकांनी आपल्या हक्कांसाठी सतर्क राहणं आणि तक्रार नोंदवणं गरजेचं आहे, तरच सरकारने केलेला करकपातीचा खरा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचेल.

News title : Gst rate cut 2025

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now