Two Wheeler Bikes | 56व्या GST परिषदेच्या बैठकीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आधीचे 12% आणि 28% टॅक्स स्लॅब रद्द करून आता फक्त दोनच स्लॅब ठेवले आहेत – 5% आणि 18%. हे नवीन दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत. याचा थेट फायदा टू-व्हीलर खरेदीदारांना मिळणार असून, लोकप्रिय बाइक व स्कूटर्स आता अधिक स्वस्त मिळतील. (Two Wheeler Bikes Price drop)
कोणत्या बाइक्स आणि स्कूटर्स होणार स्वस्त? :
350 सीसी पेक्षा कमी इंजिन असलेल्या बाइक्स व स्कूटर्सवर जीएसटी 28% वरून 18% करण्यात आला आहे. यात Hero Splendor, Bajaj Pulsar, Honda Activa सारख्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे अशा गाड्या आता ७ ते ८ हजार रुपयांनी स्वस्त मिळू शकतात. (Two Wheeler Bikes Price)
उदाहरण – सध्या दिल्लीमध्ये Hero Splendor Plus ची एक्स-शोरूम किंमत ₹79,426 आहे. नवीन जीएसटीनंतर या गाडीची किंमत सुमारे ₹7,900 ने कमी होऊन ग्राहकांना थेट दिलासा मिळेल.
Two Wheeler Bikes | कोणत्या बाइक्स महागणार? :
350 सीसीपेक्षा मोठ्या इंजिनच्या बाइक्सवर 40% फ्लॅट टॅक्स लागू होणार आहे. यामध्ये Royal Enfield सारख्या क्रूझर बाइक्सचा समावेश आहे. आधी या गाड्यांवर 28% जीएसटी आणि 3-5% सेस मिळून साधारण 32% टॅक्स लागत होता. आता तो थेट 40% झाला आहे. त्यामुळे प्रीमियम व भारी इंजिनच्या बाइक्स महाग होणार आहेत.
सरकारचा दावा आहे की या निर्णयामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांना दिलासा मिळेल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला चालना मिळेल. सणासुदीच्या काळात टू-व्हीलर विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण लोकांना आता कमी किंमतीत नवी गाडी खरेदी करता येईल.






