Green Tea | वाढत्या वजनामुळे अनेक आजार जडत असल्याने, अनेकजण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे, ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होते का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. यावर तज्ज्ञांचे काय मत आहे? ग्रीन टी पिणे खरोखरच आरोग्यासाठी चांगले आहे का? केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर अनेक आजारांवर ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरते, असे म्हटले जाते. तर मग, ग्रीन टी प्यायल्याने खरोखरच वजन कमी होते का, ते जाणून घेऊयात. (Green Tea)
फॅटी लिव्हरवरील उपचार, त्वचेवरील तेज वाढवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वजन कमी करणे यासाठी अनेकजण ग्रीन टी ला प्राधान्य देत आहेत. आरोग्यासाठी देखील ग्रीन टी चे अनेक फायदे होतात. परंतु, ग्रीन टी पिण्याचे देखील काही नियम आहेत. ते नियम काय आहेत.
ग्रीन टी मध्ये कोणती पोषक तत्वे आढळतात?
आजकाल सर्वजण आरोग्याबाबत जागरूक होत आहेत आणि त्यामुळे ग्रीन टी पिण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. या संदर्भात काही तज्ज्ञांनी सांगितले आहे की, ग्रीन टी खरोखरच वजन कमी करण्यास मदत करते. परंतु, काही लोकांना ग्रीन टी प्यायल्याने फायद्याऐवजी नुकसान होण्याचा देखील धोका असतो. ग्रीन टी मध्ये अनेक पोषक तत्वे असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये मॅगनीज, पोटॅशियम, कॉपर, आयरन, सोडियम, झिंक, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम ही खनिजे आढळतात. तसेच ग्रीन टी मध्ये कॅटेचीन आणि पॉलीफेनॉल्स सारखे अनेक अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक असतात.
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरते. यातील कॅटेचीन नावाचा अँटीऑक्सिडंट घटक शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडतो. याशिवाय, ग्रीन टी मध्ये कार्बोदके, चरबी आणि साखरेचे प्रमाण नगण्य असते. यामुळे ग्रीन टी मुळे वजन वाढण्याचा कोणताही धोका नसतो. परंतु, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, केवळ ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होत नाही, यासाठी तुमचा आहार संतुलित असणे आणि नियमित व्यायाम करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. (Green Tea)
Title : green tea and weight loss fact or myth expert opinion






