अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

On: August 9, 2024 6:43 PM
Amruta Fadnavis
---Advertisement---

Amruta Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या गायिका आहेत. अमृता यांच्या प्रत्येक गाण्याला नेटकरी प्रचंड प्रतिसाद देताना दिसतात. अशात अमृता फडणवीस यांच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या युट्यूब चॅनेलवर त्यांचं नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘सावन’ असं गाण्याचं नावं असून त्यांनी स्वतः गायलं आहे.

“इस बार तेरे शहर में , जो सावन आया है, उसे मेरी आँखों ने…बरसना सिखाया हैं”, अशा अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याच्या ओळी आहेत. या नव्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अमृता यांनी ‘सावन’ गाणं प्रदर्शित झाल्याचं जाहीर केलं आहे.

‘दिल को करार आया’, ‘गुली माता’, ‘यिम्मी यिम्मी’, ‘झालिमा’ अशा सुपरहिट गाण्यांचा गीतकार राणा सोटलने ‘सावन’ गाणं लिहिलं आहे. तर रजत नागपाल, केशव त्योहार यांनी संगीतबद्ध केलं आहे. अमृता फडणवीसांच्या ( Amruta Fadnavis ) या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाहीये.

दरम्यान, यापूर्वीच्या सगळ्याच गाण्यांना लोखोंमध्ये व्ह्यूज असले तरी अमृता फडणवीस यांच्या या गाण्याला म्हणाले तेवढे व्ह्यूज मिळाल्याचं दिसत नाहीये. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांत एक हजारच्या जवळपास व्ह्यूज आहेत.

काही महिन्यांपूर्वी अमृता यांचं ‘हे राम’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. रामनवमी निमित्तानं हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्याला 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

महत्त्वाच्या बातम्या- 

Diabetes रुग्णांसाठी ‘हे’ फळ वरदानच, पावसाळ्यात आवर्जून खाल्ले जाते!

पुण्यातील पुरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी; सरकार देणार आर्थिक मदत

एचडीएफसी बँकेचा मोठा धक्का; ऑनलाईन पेमेंट सेवा होणार बंद?

ठरलं तर! ‘या’ दिवशी सत्ताधारी व विरोधक प्रचाराचा नारळ फोडणार

पुण्यात आणखी एक हिट अँड रन; पोलीस चौकीसमोरच कारनं दुचाकीला नेलं फरफटत

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now