मृत्यूच्या काही तासांपूर्वी संदेश; अभिनेते गोवर्धन असरानींची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

On: October 21, 2025 11:12 AM
gowardhan asrani
---Advertisement---

Gowardhan Asrani | बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ विनोदी अभिनेते गोवर्धन असरानी (Gowardhan Asrani) यांचे ८४ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या निधनानंतर, त्यांनी जगाचा निरोप घेण्यापूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेली शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावरील सक्रियता –

वयाची ८० ओलांडल्यानंतरही गोवर्धन असरानी (Gowardhan Asrani) सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय होते. इंस्टाग्रामवर (Instagram) त्यांचे लाखो चाहते होते, ज्यांच्यासोबत ते नेहमी जोडलेले राहायचे. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण, आठवणी आणि कामाबद्दलची माहिती ते या प्लॅटफॉर्मवरून नियमितपणे शेअर करत असत.

त्यांच्या इंस्टाग्राम (Instagram) खात्यावर त्यांचे साडे सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. तरुण वयातील भूमिकांचे व्हिडिओ आणि सध्याच्या घडामोडी ते चाहत्यांसोबत आवर्जून शेअर करायचे. त्यांची ही सक्रियता चाहत्यांना त्यांच्या जवळ आणत असे आणि त्यांचे मनोरंजन करत राहायची.

निधनापूर्वीची ती शेवटची इन्स्टाग्राम स्टोरी –

आपल्या निधनाच्या काही तास आधी, असरानी यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) एक खास स्टोरी शेअर केली होती. सध्या सुरू असलेल्या दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या सर्व चाहत्यांना या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या स्टोरीमध्ये त्यांनी पणत्यांनी उजळलेला एक फोटो पोस्ट केला होता.

या फोटोसोबत त्यांनी ‘हॅपी दिवाळी’ (Happy Diwali) असा संदेशही लिहिला होता. हीच त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ठरली, जी आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक भावूक आठवण बनली आहे. ‘शोले’ (Sholay) चित्रपटातील ‘अंग्रेजों के जमाने का जेलर’ या भूमिकेने अजरामर झालेले असरानी यांनी अनेक दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

News Title – Gowardhan Arani last post

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now