Govind Barge Case | बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसालाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडलेल्या या घटनेने मराठवाड्यात खळबळ माजली आहे. नर्तकी पूजा गायकवाडशी असलेले त्यांचे प्रेमसंबंध हेच या मृत्यूचे ठरल्याचे दिसून येत आहे.
गोविंद बर्गे विवाहित होते आणि त्यांना दोन मुले आहेत. तरीदेखील गेल्या वर्षी धाराशिवमधील एका कलाकेंद्रात ओळख झालेल्या पूजावर ते जीवापाड प्रेम करु लागले. तिला खुश करण्यासाठी त्यांनी सोन्याचे दागिने, पैसे, जमीन आणि महागडे मोबाईल असे अनेक भेटवस्तू दिल्या. पण पूजाने अचानक त्यांच्याशी संपर्क तोडला आणि तिच्या मागण्यांवर ठाम राहिली. त्यामुळे बर्गेंच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले.
फोन न उचलल्याने वाढली निराशा :
गेल्या काही दिवसांपासून गोविंद पूजाला फोन करीत होते, पण ती सतत फोन टाळत होती. तिच्या या वागण्यामुळे ते मानसिकदृष्ट्या तणावाखाली आले होते. “बोललं नाही तर दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन” अशा धमक्याही पूजाने दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बर्गेंच्या मनात नैराश्य अधिकच वाढले. 9Govind Barge Case)
याच कारणामुळे अखेर ते सोमवारी मध्यरात्री पूजाच्या सासुरवाडी सोलापुरातील सासुरे गावात गेले. तेथील वेशीत पूजाला भेटून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण पूजाने तिच्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतल्याने वाद मिटण्याऐवजी अधिकच चिघळला.
Govind Barge Case | कारमध्ये घेतलं टोकाचं पाऊल :
निराश झालेल्या गोविंद बर्गे यांनी पूजाच्या घरातून बाहेर येऊन आपली कार गाठली. कारचा दरवाजा आतून लॉक करून त्यांनी पिस्तूल डोक्याला लावले आणि गोळी झाडून आयुष्य संपवलं. त्यांच्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात खळबळ माजली.
घटनेनंतर लगेचच पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि चौकशी सुरू केली. दरम्यान, बर्गे यांच्या मेहुण्याने वैराग पोलिस ठाण्यात पूजाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
फसवणुकीचे आरोप :
बर्गे यांच्या कुटुंबीयांच्या मते, पूजाने त्यांना अनेक प्रकारे फसवले. शेती आपल्या भावाच्या नावावर करून द्यावी, नाहीतर संबंध तोडेन अशा धमक्या ती देत होती. पैशांपासून सोन्यापर्यंत अनेक वस्तू बर्गे यांनी तिला दिल्या. तिच्या या वागण्यामुळेच शेवटी बर्गे यांनी आयुष्य संपवले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
गोविंद बर्गे (Govind Barge Death) यांच्या मृत्यूने त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे. पत्नी, दोन मुले आणि भाऊ यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांमध्येही या घटनेवरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. प्रेमसंबंधातील फसवणुकीमुळे माजी उपसरपंचाने आयुष्य संपवल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.






