Maharashtra | महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक राज्यांना याचा धक्का बसला आहे. परंतु आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. जुन ते ऑगस्ट 2025 या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली (Sangli) सारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने एकूण 689 कोटी 52 लाख 61 हजार रुपयांची मदत निधी साठी मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळेल. (Maharashtra Rain News)
1 लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली :
यंदा IMD कडून दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात सरासरी पेक्षा जास्त पाऊस असेल असे सांगितले होते. परंतु यावेळी सातारा सांगली अश्या जिल्ह्यामध्ये देखील मोठा पाऊस झाला आहे.
परभणी (Parbhani) जिल्ह्यात जून पासून पाऊस सुरु झाला होता आणि जुन ते ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्याचं नुकसान झाले आहे. साधारणपणे 2 लाख शेतकऱ्यांचे 1 लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेल्याचा अंदाज आहे. ही आकडेवारी यापेक्ष मोठीही असू शकते.
Maharashtra | शेतकऱ्यांना दिलासा मिळणार :
नांदेड (Nanded) जिल्ह्यात ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पुराचा सामना करावा लागला. यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. जवळपास 7 लाख 74 हजार 313 शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा धक्का बसला आहे. सरकार मान्य मदत निधीमुळे येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
दरम्यान, सातारा (Satara) अंदाजे 150 शेतकऱ्यांच्या 21 हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. सांगली येथे 13 हजार 475 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर 4 हजार हेक्टर जमिनी यामुळे बाधित झाल्या आहेत.
शासनाने मंजूर केलेल्या मदत निधीतून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
News title : Government’s biggest announcement for farmers! Crores of aid announced?






