10 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करणार?

On: September 12, 2024 1:05 PM
Government Job for 10th pass
---Advertisement---

Government Job | दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. त्यामुळे या संधीचा जास्तीत जास्त तरुणांनी फायदा घ्यावा. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (NPCIL) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. आज यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (Government Job)

गेल्या अनेक दिवसापासून या भरतीसाठी अर्ज करण्यात आले. अजूनही काही इच्छुक उमेदवार असतील तर त्यांना फक्त आजचा दिवस शिल्लक आहे. त्यांनी त्वरित अर्ज भरून घ्यावा. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या npcil.nic.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

वयोमर्यादा आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख?

या भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच आयटीआय उत्तीर्ण होणेही आवश्यक आहे. अर्ज करण्याची आज 12 सप्टेंबररोजी शेवटची तारीख असल्याने अर्ज भरण्यास विलंब करू नये.

या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे आहे. अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. आरक्षित वर्गाला फी भरावी लागत नाही. या भरतीमध्ये प्रथम संगणकावर आधारित चाचणी घेतली जाईल.(Government Job)

पगार किती असणार?

या चाचणीमध्ये जर उमेदवार उत्तीर्ण झाला तर त्याला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवड झाल्यास वेतन 20 हजार रुपये ते 22 हजार रुपये प्रति महिना आहे. त्यामुळे तरुणांनी लगेच अर्ज भरावे. अधिक माहितीसाठी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. (Government Job)

News Title –  Government Job for 10th pass

महत्त्वाच्या बातम्या-

मलायकाच्या वडिलांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; मिळाली धक्कादायक माहिती

झिका व्हायरस वेगाने फोफावतोय; मुंबई, पुण्यासह कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

पंकजा मुंडेंनंतर धनंजय मुंडेंची बारी?, शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत

राज्यात पुन्हा मविआची सत्ता येणार, 180 जागा जिंकणार; कुणी केला दावा?

“..तर तुझाही आजीसारखाच गेम करू”; भाजप नेत्याची राहुल गांधींना थेट धमकी

Join WhatsApp Group

Join Now