खाजगी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

On: December 31, 2025 7:05 PM
PMVY Scheme
---Advertisement---

PMVY Scheme | खाजगी क्षेत्रात नोकरीची सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने नोकरीत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. या निर्णयामुळे लाखो तरुणांना थेट फायदा होणार असून, रोजगाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात मिळणारा खर्चाचा ताण काही अंशी कमी होणार आहे.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून, प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना (PMVY / PMVRY) अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १५,००० रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे. मंत्रालयाने सोशल मीडियावरून याची घोषणा करत, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार, याबाबतही स्पष्टता दिली आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार १५,००० रुपयांचा लाभ? :

मंत्रालयाच्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ फक्त पहिल्यांदाच EPFO (Employees’ Provident Fund Organisation) मध्ये नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. म्हणजेच, जे कर्मचारी प्रथमच नोकरीला लागले आहेत आणि ज्यांचे EPF खाते यापूर्वी कधीही उघडलेले नाही, अशाच कर्मचाऱ्यांना हे १५,००० रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे.

नोकरी सुरू करताना नियोक्त्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्याचे EPF खाते उघडले जाते आणि ते आधार व बँक खात्याशी लिंक केले जाते. एकदा EPFO नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना सरकारकडून हे आर्थिक प्रोत्साहन थेट दिले जाईल. इच्छुक कर्मचाऱ्यांना या योजनेसाठी pmvry.labour.gov.in या अधिकृत पोर्टलवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

PMVY Scheme | PF नियमांत सुलभता, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा :

दरम्यान, EPFO सदस्यांसाठी PF काढण्याच्या नियमांमध्येही सुलभता आणण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, कर्मचारी लग्न, घर खरेदी किंवा घराचे नूतनीकरण, मुलांचे शिक्षण तसेच वैद्यकीय उपचारांसाठी PF मधून रक्कम काढू शकतात. यामुळे गरजेच्या वेळी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळणे अधिक सोपे होणार आहे. (PMVY Scheme)

नोकरी गमावल्यास, कर्मचाऱ्यांना एकूण PF रकमेपैकी ७५ टक्के रक्कम तात्काळ काढण्याची मुभा देण्यात आली आहे, तर उर्वरित २५ टक्के रक्कम १२ महिन्यांच्या बेरोजगारीनंतर काढता येणार आहे. तसेच, लग्नासाठी सात वर्षांच्या सेवेनंतर PF मधील ५० टक्के रक्कम काढता येते, तर वैद्यकीय उपचारांसाठी कोणत्याही सेवा कालावधीच्या अटीशिवाय संपूर्ण रक्कम किंवा सहा महिन्यांचा पगार काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच PF ATM कार्डची सुविधाही सुरू होण्याची शक्यता असून, त्यामुळे PF व्यवहार आणखी सोपे होणार आहेत.

News Title: Government Announces ₹15,000 Incentive for First-Time Private Employees Under PMVY Scheme

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now