Sharad Pawar | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मारकडवाडी प्रकरण आणि निवडणूक आयोगाबाबत केलेल्या विधानांच्या संदर्भात बोलताना पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांना थेट “कारस्थानाचा कारखाना” म्हटले आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
“पवार म्हणजे आधुनिक नारदमुनी” :
पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले की, शरद पवार हे कारस्थान रचण्यात पारंगत आहेत. “मारकडवाडी प्रकरणात पवारांनी देशाच्या निवडणूक आयोगावर शंका निर्माण करण्याचे काम केले. निवडणूक आयोगासारख्या संस्थेची बदनामी करणे म्हणजे थेट देशाच्या लोकशाहीवर आघात आहे,” असे ते म्हणाले.
याचबरोबर पवारांना “आधुनिक काळातील नारदमुनी” असे संबोधत पडळकर पुढे म्हणाले की, एकीकडे पवार मंडल यात्रा काढतात, तर दुसरीकडे त्यांचा नातू मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतो. ही दुतोंडी भूमिका लोकांना दिशाभूल करणारी आहे.
Sharad Pawar | जयंत पाटील प्रकरणाचा उल्लेख :
पडळकर यांनी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांचा उल्लेख करताना म्हटले की, “जर जयंत पाटलांनी (Jayant Patil) आत्महत्या केली तर मला एक नंबरचा आरोपी करा.” त्यांनी पवारांवर आरोप करताना म्हटले की, “सहकार क्षेत्रात पवारांचे प्राबल्य आहे. पण जर या क्षेत्रात ईव्हीएम यंत्रणा आली तर हे प्राबल्य संपणार आहे. म्हणूनच पवार लोकांमध्ये शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.”
शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीत दोन लोकांनी त्यांना १६० आमदार जिंकवून देण्याची ऑफर दिल्याचा दावा केला होता. यावर पडळकर म्हणाले की, “हे षडयंत्र पवारांनी तात्काळ गृहमंत्र्यांना सांगायला हवे होते. पण त्यांनी हे राहुल गांधींना सांगितले. पोलिसांऐवजी राहुल गांधींकडे जाणं म्हणजे षडयंत्र नाही का?” असा सवालही त्यांनी केला.






