अटक केल्यानंतर गोपाल बदनेने सर्वांसमोर सगळंच सांगून टाकलं!

On: October 26, 2025 1:19 PM
gopal badne
---Advertisement---

Gopal Badne | सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आता नव्या वळणावर आले आहे. पीडितेने सुसाईड नोटमध्ये नाव घेतलेला मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक (PSI) अखेर पोलिसांना शरण आला आहे. त्याने स्वतःवरील आरोप फेटाळत आपल्याला यात गोवण्यात येत असल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.

फरार पोलीस निरीक्षक स्वतःहून हजर-

फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांनी आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत पीएसआय गोपाल बदने (Gopal Badne) याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. या घटनेनंतर बदने फरार झाला होता. मात्र, काल रात्री उशिरा तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली.

चौकशीनंतर बदने (Gopal Badne) याला वैद्यकीय तपासणीसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात (Phaltan Sub-District Hospital) नेण्यात आले. यावेळी त्याने माध्यमांशी बोलताना, “मला निष्कारण अडकवले जात आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. त्याने गाडीत बसल्यानंतर कॅमेरासमोर हातही जोडले. त्याच्या या प्रतिक्रियेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

प्रशांत बनकर कोठडीत, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष-

या प्रकरणातील दुसरा आरोपी, प्रशांत बनकर (Prashant Bankar), ज्याच्यावर डॉ. मुंडे यांनी शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला होता, त्याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. पुण्यातील (Pune) एका मित्राच्या फार्महाऊसवरून त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फलटण (Phaltan) येथे दौरा आहे. या पार्श्वभूमीवर, ते या संवेदनशील प्रकरणावर काय भाष्य करणार आणि तपासासंदर्भात काय निर्देश देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बदनेच्या शरणागतीमुळे आणि त्याच्या दाव्यामुळे आता पोलिसांसमोरील तपासाचे आव्हान अधिक वाढले आहे.

News Title – gopal badne reveals about dr. sapamda munde

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now