Ration Card News | राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दीड वर्षांपासून बंद असलेला रेशन दुकानांतील साखरेचा पुरवठा अखेर पुन्हा सुरू होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला असून गरीब व गरजू कुटुंबांना नववर्षापूर्वी मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून साखर बंद असल्याने अनेक कुटुंबांना बाजारातून महाग दरात साखर खरेदी करावी लागत होती.
पुरवठा विभागाने नोव्हेंबर, डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या तीन महिन्यांसाठी साखर उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे. टेंडर प्रक्रियेत अडथळे आल्यामुळे जवळपास दीड वर्षापासून साखरेचे वितरण थांबले होते. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील हजारो अंत्योदय कुटुंबांवर झाला होता. मात्र अखेर शासनाच्या निर्णयानंतर पुन्हा साखर वितरण सुरू होत असल्याने गरीब कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
अंत्योदय कुटुंबांना प्रति महिना १ किलो साखर :
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना (ration shop sugar price) आता प्रत्येक महिन्याला एक किलो साखर दिली जाणार आहे. राज्यातील सुमारे 87 हजारांहून अधिक अंत्योदय कार्डधारक कुटुंबांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाने सतत शासनाकडे पाठपुरावा करून साखर नियतनाची मागणी केली होती, त्याला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. (Antyodaya sugar distribution)
सध्या बाजारात साखरेचा दर ₹44 ते ₹46 प्रति किलो इतका आहे. मात्र रेशन दुकानांतून हीच साखर केवळ ₹20 प्रति किलो या सबसिडी दरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेषत: सण-उत्सवांच्या काळात गोड पदार्थांच्या तयारीसाठी साखरेची मोठी गरज असते. त्यामुळे आता कमी दरात साखर उपलब्ध झाल्याने कुटुंबांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
Ration Card News | शासनाचे नियतन मंजूर; काही ठिकाणी वाटप सुरू :
अन्न व नागरी पुरवठा विभागाला नोव्हेंबर, डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या तीन महिन्यांसाठी एकूण पाच हजार क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झाले आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात ही साखर दाखल झाली असून वितरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. काही तालुक्यांमध्ये साखर वितरण सुरूही झाले आहे.
आगामी काही दिवसांत सर्व रेशन दुकानांतून पूर्ण क्षमतेने साखर वाटप सुरू होणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. दीड वर्षांपासून साखर न मिळाल्यामुळे होत असलेल्या तक्रारी, नाराजी आणि आर्थिक ताण लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नववर्षापूर्वीच गोडवा परतल्याने अंत्योदय कुटुंबांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा खुलले आहे.






