राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!

On: May 19, 2025 2:03 PM
Gharkul
---Advertisement---

Gharkul Yojana | राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना (Gharkul Yojana Maharashtra 2025) पुढील १५ दिवसांसाठी ५ ब्रासपर्यंत वाळू मोफत मिळणार आहे. राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी ही माहिती दिली आहे.

घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा

काही दिवसांपूर्वीच, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर विभागातील घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत वाळू मोफत देण्याचे आदेश विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना दिले होते. या आदेशानुसार, तहसीलदारांना जवळचा वाळू गट नमूद करून पात्र लाभार्थ्यांना अर्जाशिवाय ऑनलाईन पास उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, आता राज्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना १५ दिवस मोफत वाळू मिळणार असल्याचे आशिष जयस्वाल यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, आशिष जयस्वाल यांनी राज्यात सर्वत्र वाळू माफियांचे राज्य असल्याचे वक्तव्य करून महायुती सरकारला घरचा आहेर दिला होता. राज्य सरकारने वाळूविषयक धोरण लागू केले असले, तरी सामान्य नागरिकांना वाळू मिळणे कठीण झाले आहे, अशी कबुली त्यांनी दिली होती. गडचिरोली येथे खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

१५ दिवस ५ ब्रास वाळू मोफत

मंत्री जयस्वाल यांनी सांगितले होते की, घरकुल बांधकामासाठी नागरिकांना स्वस्त दरात वाळू मिळावी आणि काळाबाजार थांबावा, यासाठी राज्य सरकारने नवीन वाळू धोरण लागू केले आहे. या धोरणानुसार, तहसीलदारांनी घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू ६५० रुपये दराने घरपोच उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, आता राज्य सरकारने सर्व लाभार्थ्यांना १५ दिवस ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

 Title: Good News for Gharkul Yojana Beneficiaries! 5 Brass Sand Free for 15 Days

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now