Gold-Silver Today Price | आज 12 ऑक्टोबररोजी दसरा हा सण साजरा केला जाईल. सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात सोन्याचे चांगलीच आघाडी घेतली. मौल्यवान धातू चांगलेच वधारले. या आठवड्यात देखील सोनं भाव खाऊन गेलं. 7 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी उतरले. मंगळवारी भाव जैसे थे होते. 9 ऑक्टोबर रोजी सोने 760 रुपयांनी तर त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी त्यात किंचित घसरण झाली. आज 12 ऑक्टोबररोजी आठवड्याच्या शेवटी सोन्याने पुन्हा आघाडी घेतली आहे. (Gold-Silver Today Price)
दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोनं खरेदी करतात. मात्र, या सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. मौल्यवान धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली. या दमदार चढाईमुळे दसऱ्याला खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकाचा खिसा कापल्या जाणार आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यात चांदीने पुन्हा एकदा भरारी घेतली आहे. 8 आणि 9 ऑक्टोबररोजी चांदी 3 हजार रुपयांनी घसरली. तर, 11 ऑक्टोबररोजी चांदी 2 हजारांनी महाग झाली. आज 12 ऑक्टोबररोजी देखील चांदीमध्ये दरवाढ दिसून आली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय?
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,623, 23 कॅरेट 75,320, 22 कॅरेट सोने 69,271 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 56,717 रुपये, 14 कॅरेट सोने 44,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Today Price)
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Today Price)






