सोने-चांदी स्वस्त; काय आहेत आजचे दर? पाहा एका क्लिकवर

On: March 9, 2026 12:57 PM
Gold Rate
---Advertisement---

Gold Silver Rate | गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पहायला मिळत आहेत. सतत बदलणाऱ्या दरांमुळे नागरिकही हैराण झाले आहेत. अशातच आज मात्र दिलासादायक बातमी समोर आली आहे. सलग वाढीनंतर आज सोने-चांदीच्या किमतींमध्ये अचानक घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस थोडा दिलासादायक ठरू शकतो.

काय आहे सोने-चांदीचा दर? (Today Gold Silver Rate)

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्याचे दिसून आले.9 मार्च 2026 रोजी सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरांनी खालची पातळी गाठल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गगनाला भिडणाऱ्या किमतींनंतर आलेली ही घसरण गुंतवणूकदारांसाठी अनपेक्षित व महत्त्वाची ठरत आहे.

सोने (एप्रिल फ्युचर्स) : प्रति 10 ग्रॅम ₹1,107 ने घसरून ₹1,60,527
चांदी (मे फ्युचर्स) : प्रति किलो ₹5,248 ने घसरून ₹2,63,037

बाजारात घसरण का झाली?

बाजार तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीने उच्चांकी स्तर गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा वसुली सुरू केली आहे. वाढलेल्या किमतीत विक्री वाढल्यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आणि दरात कपात झाली. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलर (Dollar) अधिक मजबूत होणे आणि बाँडच्या परताव्यातील बदल ही देखील या घसरणीची महत्त्वाची कारणे मानली जात आहेत.

दरम्यान, मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेनंतर बाजार आता हळूहळू स्थिरतेकडे वाटचाल करत असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सुरुवातीला किमतींमध्ये चढ-उतार दिसत असले तरी पुढील काळात बाजाराची दिशा जागतिक घडामोडींवर अवलंबून राहणार आहे.

खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे का?

सोने किंवा चांदी खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी ही घसरण संधी ठरू शकते. नवीन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर असला, तरी बाजारातील चढ-उतार लक्षात घेता तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच गुंतवणूक करणे योग्य ठरेल.

Join WhatsApp Group

Join Now