सोनं पुन्हा झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

On: September 9, 2024 9:40 AM
Gold-Silver Rate Today 9 September 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. या सणासुदीच्या काळात मौल्यवान धातूने देखील दिलासा दिला आहे. सोने-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. देशात आज 9 सप्टेंबररोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66,940 रुपये आहे. तर, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 73,010 रुपये आहे. सध्या सराफ बाजारात आगामी काही दिवसांत सोने आणखी महाग होणार, असा अंदाज लावला जात आहे. मात्र सध्या तरी किमती या घसरताना दिसून येत आहेत.(Gold-Silver Rate Today )

मागच्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,020 रुपये प्रती 10 ग्रॅम होता. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1, 2 आणि 3 सप्टेंबररोजी सोन्याचे दर खाली आले. 2 सप्टेंबर रोजी 270 रुपयांची घसरण दिसली. तर 5 तारखेला भाव स्थिर होते. 6 तारखेला पुन्हा घसरण दिसून आली. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील घसरणीचे संकेत मिळाले. आज चांदीने देखील काही अंशी दिलासा दिला आहे.  गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.(Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.

22 आणि 24 कॅरेटमधील फरक काय?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध सोने मानले जाते. 22 कॅरेट सोने तांबे, चांदी, जस्त यांसारखे 9% इतर धातू जोडून तयार केले जाते. 24 कॅरेट सोने चमकदार असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. (Gold-Silver Rate Today )

घरबसल्या जाणून घ्या भाव-

दरम्यान ग्राहक घरबसल्या देखील सोने-चांदीचे दर जाणून घेऊ शकतात. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.(Gold-Silver Rate Today )

News Title – Gold-Silver Rate Today 9 September 2024

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांचं धक्कातंत्र सुरूच, पुण्यात भाजपच्या बड्या नेत्याकडून ‘तुतारी’चा प्रचार

देशात आढळला पहिला मंकीपॉक्स संशयित रुग्ण?, ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींवर बरसणार सुखाच्या सरी, मिळेल शुभवार्ता

काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का; ‘हा’ नेता करणार घरवापसी?

गणेश चतुर्थीनिमित्त सरकारने घेतला मोठा निर्णय!

Join WhatsApp Group

Join Now