आनंदवार्ता! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, काय आहेत सध्या दर?

On: January 7, 2025 9:51 AM
Gold-Silver Rate Today 7 January 2025
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातू सोन्याने चांगलीच आघाडी घेतली. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतीमध्ये दरवाढ दिसून आली. सोन्याने 1600 रुपयांची तर चांदीने किलोमागे 2 हजारांची झेप घेतली. मात्र, जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दोन्ही धातूंनी जरा नरमाईची भूमिका घेतलीये. (Gold-Silver Rate Today)

गेल्या आठवड्यात सोन्याने ग्राहकांचा खिसा चांगलाच खाली केला होता. सोन्याने 1600 रुपयांची रॉकेट भरारी घेतली. तर, काल सोमवारी 6 जानेवारीरोजी किमतीमध्ये कोणताच बदल दिसला नाही. आज 7 जानेवारीरोजी सकाळच्या सत्रात मौल्यवान धातू सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत.

गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीने देखील या आठवड्यात आनंदवार्ता दिली. 3 जानेवारी रोजी चांदीने 2 हजारांनी उसळली घेतली. तर 4 जानेवारीला 1 हजारांनी किंमत उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव सध्या 91,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेट दर जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,161, 23 कॅरेट 76,852, 22 कॅरेट सोने 70,680 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट सोने आता 57,871 रुपये, 14 कॅरेट सोने 45,139 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 7 January 2025

महत्त्वाच्या बातम्या-

अलर्ट! महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव, ‘या’ ठिकाणी आढळले रुग्ण

यंदाच्या वर्षी विवाहासाठी शुभ मुहूर्त किती?, पाहा संपूर्ण लिस्ट

आजपासून शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ, देवी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी?

’20 मिनिटांत आणून सोडतो म्हणत 36 व्या काॅलनंतर…’; सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा!

मोठी बातमी! धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?

Join WhatsApp Group

Join Now