खुशखबर! सोनं झालं स्वस्त, चांदीचाही मोठा दिलासा

On: August 7, 2024 12:05 PM
Gold-Silver Rate Today 7 August 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | या आठवड्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. काल 6 ऑगस्टरोजी सोने किंचित उसळले होते. मात्र, आज बुधवारी 7 ऑगस्टरोजी भाव पुन्हा घसरला आहे. चांदीत (Gold-Silver Rate Today) देखील तब्बल 3 हजारांहून अधिक घसरण झाली आहे.

6 ऑगस्ट रोजी सोन्यात 870 रुपयांची घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा सोन्यात घसरणीचे संकेत दिसले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 64,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोने-चांदी स्वस्त

मागच्या आठवड्यामध्ये चांदीचे दर वाढले होते. तर या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी तितकीच घसरण झाली. सोमवारी चांदीचे दर 200 रुपयांनी वाढले. (Gold-Silver Rate Today) तर, काल मंगळवारी 3200 रुपयांची घसरण झाली.आजही चांदी उतरली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 82,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69,182, 23 कॅरेट 68,905, 22 कॅरेट सोने 63,371 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,887 रुपये, 14 कॅरेट सोने 40,472 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (Gold-Silver Rate Today) उतरले आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव-

दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

News Title : Gold-Silver Rate Today 7 August 2024

महत्त्वाच्या बातम्या-

‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा देऊन..; कंगनाकडून विनेश फोगटला उपरोधिक शुभेच्छा

राज्यात वेगाने फोफावतोय ‘हा’ गंभीर आजार; पुण्यात सर्वाधिक रुग्ण

‘या’ महिलांना मिळणार 10 हजारांचा लाभ? सरकारची नवीन योजना

विनेश फोगटचा गोल्ड मेडलसाठीचा LIVE सामना कधी व कुठे पाहता येणार?

रितेश देशमुखबद्दल जिनिलियाने केला सर्वात मोठा खुलासा!

Join WhatsApp Group

Join Now