Gold-Silver Rate Today | गणेशोत्सव आता अवघ्या एक दिवसावर आला आहे. त्यापूर्वीच मौल्यवान धातूने आनंदवार्ता दिली आहे. सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून नरमाई दिसून आली आहे. लाडक्या बाप्पासाठी अनेक जण चांदीचे आभूषणे खरेदी करत असतात. अशात ग्राहकांना दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. आज 6 सप्टेंबररोजी सोने आणि चांदी दोन्ही धातूने नरमाई दाखवली आहे.(Gold-Silver Rate Today )
या आठवड्यात म्हणजेच 2 आणि 3 सप्टेंबररोजी सोन्याचे दर खाली आले. 2 सप्टेंबर रोजी 270 रुपयांची घसरण दिसली. काल 5 तारखेला भाव स्थिर होते. आज सकाळच्या सत्रात मात्र घसरणीचे संकेत मिळाले. त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,830 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यामध्ये चांदीचे दर स्थिर दिसून आले. 2 आणि 4 सप्टेंबररोजी चांदीमध्ये 2 हजारांची घसरण झाली. आज देखील चांदीचे दर उतरले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.(Gold-Silver Rate Today )
जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा भाव-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,875, 23 कॅरेट 71,587, 22 कॅरेट सोने 65,838 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,906 रुपये, 14 कॅरेट सोने 42,047 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.(Gold-Silver Rate Today )
घरबसल्या जाणून घ्या भाव-
दरम्यान ग्राहक घरबसल्या देखील सोने-चांदीचे दर जाणून घेऊ शकतात. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.(Gold-Silver Rate Today )
News Title – Gold-Silver Rate Today 6 September 2024
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यात 29 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार, महाराष्ट्रात 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता
आज हरितालिकेचा व्रत, जाणून घ्या पूजेची योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त
आज हरतालिका व्रत, ‘या’ 5 राशींवर राहील शिव-पार्वतीची कृपा
वनराज आंदेकरच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतली शपथ, म्हणाले ‘आता मी…’
इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ, दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्याने खळबळ






