सोनं खरेदी करावं की नाही?, दरवाढीचं सत्र सुरूच; जाणून घ्या आजचे दर

On: October 4, 2024 10:00 AM
Gold-Silver Rate Today 4 October 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | जागतिक घडामोडींमुळे देशात सोने-चांदीचे दर वाढतच चालले आहेत. अवघ्या दोन दिवसांत सोन्याने 600 रुपयांहून अधिकची उसळी घेतली. चांदीच्या किमती देखील वरचढ आहेत. मात्र, सध्या चांदीचे दर स्थिर आहेत. मौल्यवान धातू सोने तर सतत उसळी घेत असल्याचं चित्र आहे. यामुळे ग्राहकांना ऐन सणासुदीत सोनं खरेदी करावं की नाही, हा प्रश्न पडतोय. (Gold-Silver Rate Today )

मागील आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले होते. 30 सप्टेंबर रोजी सोने 160 रुपयांनी तर 1 ऑगस्ट रोजी 330 रुपयांनी सोने घसरले होते. 2 ऑक्टोबर रोजी सोनं पुन्हा 540 रुपयांनी महागले. काल 3 ऑक्टोबर रोजी सोने 110 रुपयांनी वधारले.

आज 4 ऑक्टोबररोजी देखील सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याचे दर जवळपास 80 हजारांवर पोहोचले आहेत. या महिन्यात देखील सोन्याने दरवाढीचा हा नवीन विक्रम केलाय. तर, चांदीचे दर सध्या स्थिर आहेत. 29 सप्टेंबरपासून चांदीची विश्रांती सुरु आहे. किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,615, 23 कॅरेट 75,312 रुपये, 22 कॅरेट सोने 69,263 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 56,711 रुपये, 14 कॅरेट सोने 44,235 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 4 October 2024

महत्त्वाच्या बातम्या-

दिवाळी गिफ्ट! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, जाणून घ्या याचे काय फायदे मिळणार!

मोठी बातमी! शिंदे गटाच्या मंत्र्याचा भीषण अपघात, पिकअपला दिली जोरदार धडक

आज ‘या’ राशींवर राहणार देवी ब्रह्मचारिणीची कृपा!

राजकीय भूकंप! भाजपचा ‘हा’ बडा नेता ‘तुतारी’ हाती घेणार?

Join WhatsApp Group

Join Now