Valentine’s Day दिवशी आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

On: February 14, 2024 4:01 PM
Gold-Silver Rate
---Advertisement---

Gold-Silver Rate | जगभरात आज प्रेमाचा दिवस साजरा केला जात आहे. 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. प्रेमीयुगूल हा दिवस एकमेकांना भेटवस्तु देऊन साजरा करतात. आज तुम्हालाही तुमच्या प्रिय व्यक्तीला महागडी भेट द्यायची असेल, तर तुमच्यासाठी (Gold-Silver Rate) आज मोठी गुड न्यूज आहे.

सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. त्यामुळे तुम्हीही तुमच्या प्रेयसीला दागिने किंवा अंगठी भेट म्हणून देऊ शकता. आज सोने-चांदीचे भाव उतरले आहेत. त्यामुळे आज सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. आजचे सोने-चांदीचे दर खाली दिले आहेत.

सोने-चांदीचे आजचे दर

या महिन्यात सोने (Gold-Silver Rate) तब्बल 920 रुपयांनी स्वस्त झाले तर त्यात 510 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात्याही त्यात मोठी घसरण दिसली. 13 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव पुन्हा 110 रुपयांनी उतरला. गुड रिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

तर चांदीमध्येही आज सकाळी भाव कमी झाले. चांदीत 12 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली होती. तर आज सकाळी 100 रुपयांची त्यात घसरण झाली आहे. त्यानुसार एक किलो चांदीचा भाव 75,400 रुपये झाला आहे. महिन्याच्या सुरुवातीला 700 रुपयांणी चांदी उतरली होती. तर पुढे या किमती पुन्हा वाढल्या.

कॅरेटचा भाव कसा असणार?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आजच्या (Gold-Silver Rate) सोने-चांदीच्या कॅरेटनुसार किमती ठरल्या आहेत. त्यानुसार 24 कॅरेट सोने 62,394 रुपये, 23 कॅरेट 62,144 रुपये, 22 कॅरेट सोने 57,153 रुपये झाले. 18 कॅरेट 46,796 रुपये, 14 कॅरेट सोने 36,501 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

एक किलो चांदीचा भाव 71,042 रुपये झाला आहे. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत होत असते.

News Title- Gold Silver Rate Today

महत्वाच्या बातम्या- 

ऐश्वर्याच्या सौंदर्याची कंगनालाही पडली भुरळ; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केली प्रशंसा

शेतकरी आंदोलन! …तर यावेळी देखील होणार हजारो कोटींचे नुकसान, व्यापाऱ्यांना चिंता

इशान किशनला घमंडीपणा नडणार; BCCI कडक कारवाई करण्याच्या तयारीत

…तर तुमचे पैसे बुडालेच म्हणून समजा; सेबीचा गुंतवणूकदारांना इशारा!

“भाजपने राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली पण मी…”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

Join WhatsApp Group

Join Now