लक्ष्मीपूजनापूर्वीच सोनं महागलं; जाणून घ्या आजचे लेटेस्ट भाव

On: October 31, 2024 11:54 AM
Gold-Silver Rate Today 31 October 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | देशभरात सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. दिवाळी हा सर्वात मोठा सण असून जवळपास संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने तो साजरा केला जातो. दिवाळीत सर्वच प्रकारच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. त्यातच सोनं खरेदी करणं देखील एक परंपरा आहे. या काळात सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं.मात्र, या दिवाळीत सोन्याने ग्राहकांच्या खिशावर चांगलाच खाली केलाय. सोन्याचे दर अजूनही तेजीत दिसून येत आहेत. (Gold-Silver Rate Today)

या आठवड्याच्या सुरुवातीला सोनं स्वस्त झालं होतं. आता आठवड्याच्या शेवटच्या दिवसात सोनं पुन्हा वधारलं आहे. आज महिन्याच्या शेवटी 31 ऑक्टोबररोजी मौल्यवान धातुने जोरदार उसळी घेतली आहे. पडझडीनंतर लक्ष्मी पूजनापूर्वीच दोन्ही धातुनी जोर लावला.

आजचे सोने-चांदीचे दर

29 ऑक्टोबर रोजी सोन्याने 600 रुपयांची आणि 30 ऑक्टोबर रोजी 700 रुपयांची भरारी घेतली.आज सकाळच्या सत्रात देखील सोनं तेजीत दिसून येत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोनं 74,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तर, चांदीने देखील पुन्हा भरारी घेतली आहे. गेल्या 15 दिवसांत चांदीने मोठी उसळी घेतली. मागील आठवड्यात चांदी 3 हजार रुपयांनी महागली होती. 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी त्यात प्रत्येकी 1 हजार रुपयाची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1 लाख रुपये झाला आहे. (Gold-Silver Rate Today)

14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोनं 78,745, 23 कॅरेट 78,430, 22 कॅरेट सोने 72,130 रुपयांवर पोहोचले. 18 कॅरेट सोन्याचे भाव आता 59,059 रुपये, 14 कॅरेट सोने 46,066 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. (Gold-Silver Rate Today)

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 31 October 2024

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपचे ‘हे’ 12 नेते शिंदेंच्या धनुष्यबाणावर तर 5 जण घड्याळच्या तिकिटावर रिंगणात!

ऐन दिवाळीत उडणार महागाईचा भडका?, 1 नोव्हेंबरपासून ‘या’ नियमांत बदल होणार

“बेबी..आपली लव्हस्टोरी रामायणापेक्षा कमी नाही”; सुकेशचं जॅकलिनला आणखी एक पत्र

आज नरक चतुर्दशी, कुणाचं नशीब सोन्यासारखं चमकणार?; वाचा राशीभविष्य

2024 मध्ये ‘या’ पक्षाचा असणार मुख्यमंत्री; राज ठाकरेंचं भाकीत

Join WhatsApp Group

Join Now