Gold-Silver Rate Today | आज 31 डिसेंबररोजी वर्षाच्या शेवटच्या दिवशी मौल्यवान धातू सोन्याला मोठी आघाडी घेता आली नाही. या वर्षात 63 ते 65 हजारावरून सोन्याने 81 हजारांचा तर चांदीने 1 लाखांचा टप्पा ओलांडला. या वर्षात सोन्याने दरवाढीचे अनेक विक्रम केले आणि तोडले देखील. 1 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 63,353 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. तर 1 जुलै रोजी सोने थेट 71 हजारांवर पोहोचले. (Gold-Silver Rate Today)
यानंतर काही महिन्यातच सोन्याने थेट 80 हजारांचा देखील टप्पा ओलांडला. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस सोन्याला चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. डिसेंबर महिन्यात सोन्याला एकदम मोठी आघाडी घेता आली नाही. आज 31 डिसेंबररोजी ग्राहकांना दिलासा मिळाला की त्यांचा खिसा कापला गेला ते पाहुयात-
या महिन्यात 9 ते 15 डिसेंबर दरम्यान सोन्याचे भाव वरचढ दिसले. या आठवड्याच्या सुरुवातीला 30 डिसेंबर रोजी सोने 160 रुपयांनी वधारले. तर, आज 31 डिसेंबररोजी सोन्यात किंचित दरवाढ दिसून येत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या महिन्यात चांदीला सूर गवसला नाही. गेल्या आठवड्यात चांदी 1,100 हजार रुपयांनी वाढली. तर 30 डिसेंबर रोजी चांदीच्या किमती जैसे थेच होत्या. वर्षाच्या अखेरच्या दिवशी 31 डिसेंबर रोजी चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,400 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,194, 23 कॅरेट 75,889, 22 कॅरेट सोने 69,794 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,146 रुपये, 14 कॅरेट सोने 44,574 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 31 December 2024
महत्त्वाच्या बातम्या-
वाल्मिक कराड कुठे लपून बसलाय?, सर्वात मोठी अपडेट समोर
मुंबईकरांनो थर्टी फर्स्टला दारू आणि पार्ट्या जरा जपून; अन्यथा…
‘नक्की कोण कुणाचा आका?’; वाल्मिक कराडचा शिंदे-फडणवीस व अजितदादांसोबतचा फोटो व्हायरल
वर्षाच्या शेवटच्या दिवशी देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव!
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, नागरिकांच्या आरोग्यासाठी BMC उचलणार कठोर पाऊल






