सोन्याने दिली स्वस्ताईची वार्ता, ‘इतका’ घसरला भाव; जाणून घ्या आजचे दर

On: September 3, 2024 10:32 AM
Gold-Silver Rate Today 3 September 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या पाच दिवसांत मौल्यवान धातूमध्ये घसरणीचे सत्र दिसून आले. त्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. देशात आता सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे बेशकिंमती धातूत उसळी येऊ शकते. पण, सध्या किमती उतरल्या आहेत. (Gold-Silver Rate Today)

सोने आणि चांदी या दोन्ही धातूमध्ये दोन आठवड्यापासून मोठी उलाढाल दिसली नाही. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंमतीत अनुक्रमे 100,110 रुपयांची घसरण झाली होती. 1 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. 2 सप्टेंबर रोजी किंमती 270 रुपयांनी उतरल्या.

सोने-चांदीच्या किंमती

तर आज 3 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) आता 22 कॅरेट सोने 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,920 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. (Gold-Silver Rate Today)

चांदीमध्ये देखील घसरण झाली आहे. 30 आणि 31 ऑगस्टरोजी चांदी 1500 रुपयांनी घसरली. तर, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबररोजी चांदीत 1 हजारांची घसरण झाली. तर आज सकाळच्या सत्रात देखील घसरणीचे संकेत मिळाले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचे दर काय?

गुडरिटर्न्सनुसार, सध्या 24 कॅरेट सोने 71,511, 23 कॅरेट सोने 71,225, 22 कॅरेट सोने 65,504 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 53,633 रुपये, 14 कॅरेट सोने 41,834 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान,वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.(Gold-Silver Rate Today )

News Title – Gold-Silver Rate Today 3 September 2024

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला मोठा धक्का, समरजितसिंह घाटगे ‘तुतारी’ फुंकणार; आज होणार जाहीर पक्षप्रवेश

1 सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या बहीणींना किती लाभ मिळणार?, 4500 की फक्त1500?

मोठी बातमी! हवाई दलाचं मिग 29 विमान कोसळून मोठा स्फोट; पाहा Video

‘या’ राशीच्या लोकांच्या दारी येईल लक्ष्मी, मिळेल पैसाच पैसा!

प्रिया बापटचे बोल्ड सीन्स, रितेश देशमुखचा नवा अंदाज… टीझरवर प्रेक्षकांच्या उड्या

Join WhatsApp Group

Join Now