नवरात्रीत सोन्याने दाखवला दरवाढीचा रंग, जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर

On: October 3, 2024 9:38 AM
Gold-Silver Rate Today 3 October 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | सप्टेंबर महिन्यात मौल्यवान धातू सोने चांगलेच तेजीत होते. सोन्याच्या किमतीमध्ये सतत दरवाढ दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यात देखील दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याने मोठी भरारी घेतली आहे. (Gold-Silver Rate Today )

मागच्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी महागले होते. 30 सप्टेंबर रोजी सोने 160 रुपयांनी उतरले होते. तर 1 ऑक्टोबर रोजी त्यात 330 रुपयांची घसरण झाली.  2 ऑक्टोबर रोजी सोन्याने पुन्हा 540 रुपयांची मुसंडी मारली. आज सकाळच्या सत्रात देखील मौल्यवान धातुत वाढ झाली.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार , आता 22 कॅरेट सोने 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदी देखील सध्या सुसाट आहे. चांदीत गेल्या आठवड्यात तब्बल 6 हजार रुपयांची दरवाढ झाली. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत चांदीचे दर स्थिर आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,515, 23 कॅरेट 75,213, 22 कॅरेट सोने 69,172 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 56,636 रुपये, 14 कॅरेट सोने 44,176 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. (Gold-Silver Rate Today )

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 3 October 2024

महत्त्वाच्या बातम्या-

विधानसभेपूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी?, शिंदे गटाच्या मंत्र्याचा थेट भाजपला इशारा

आजपासून नवरात्रीला सुरुवात, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त व पूजेची पद्धत

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी

तृप्ती डिमरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संतापले

तीन कार लाँच! दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा भन्नाट फीचर्ससह ‘या’ कार

Join WhatsApp Group

Join Now