Gold-Silver Rate Today | देशभरात सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो. आज धनत्रयोदशी असून आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. आज ग्राहकांची सराफा बाजारात प्रचंड गर्दी असते. तर, सोनं खरेदी करण्यापूर्वी ते स्वस्त झालं की महाग?, 10 ग्रॅमचे दर काय आहेत, याबाबत या लेखात सविस्तर माहिती दिली आहे. (Gold-Silver Rate Today)
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,188 रुपये आहे. तर, 24 कॅरेटसाठी तुम्हाला 78,750 रुपये मोजावे लागतील. तसेच, 1 किलो चांदीची किंमत ही आज 97 हजार 650 रुपये प्रती किलो आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
मुंबई : 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 72,059 रुपये तर, 24 कॅरेट सोनं 78,610 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुणे : 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 72,059 रुपये तर, 24 कॅरेट सोनं 78,610 प्रति 10 ग्रॅम आहे.
नागपूर : 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 72,059 रुपये तर, 24 कॅरेट सोनं 78,610 प्रति 10 ग्रॅम आहे.
नाशिक : 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 72,059 रुपये तर, 24 कॅरेट सोनं 78,610 प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold-Silver Rate Today)
22 आणि 24 कॅरेटमधील फरक काय?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध सोने मानले जाते. 22 कॅरेट सोने तांबे, चांदी, जस्त यांसारखे 9% इतर धातू जोडून तयार केले जाते. 24 कॅरेट सोने चमकदार असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. (Gold-Silver Rate Today)
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 29 October 2024
महत्त्वाच्या बातम्या-
महायुतीत भाजपच ठरला मोठा भाऊ?, उमेदवारांची चौथी यादीही जाहीर
निवडणुकीच्या काळात झिशान सिद्दीकींच टेन्शन वाढवणारी बातमी समोर!
माढ्यात शरद पवार खेळणार मराठा कार्ड?, अभिजीत पाटलांनी घेतली जरांगेंची भेट
सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीच्या काळात बदलणार अनेक नियम
तिकीट न मिळाल्याने नाराजी, मुंबईत महायुतीच्या तीन जागांवर बंडखोरी






