या आठवड्यात सोन्याचा मोठा दिलासा; 10 ग्रॅम सोनं फक्त..

On: July 27, 2024 10:23 AM
Gold-Silver Rate Today 27 july 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | या आठवड्यात सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या आठवड्यात चांदी 7 हजारांनी स्वस्त झाली. तर सोन्यामध्ये देखील नरमाई दिसून आली. सीमा शुल्क कपातीचा फायदा ग्राहकांना (Gold-Silver Rate Today) झाला आहे.

18 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,750 रुपये होता. काल 26 जुलै रोजी हा भाव 63,150 रुपयांवर आला. तर, आज 27 जुलैरोजी देखील घसरणीचे संकेत मिळाले. म्हणजेच या आठवड्यात 10 ग्रॅम सोने 5,600 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

तसेच 24 कॅरेट सोन्याचा भाव 18 जुलै 74,990 रुपये होता. तो 26 जुलै रोजी 68,880 रुपयांवर आला. म्हणजे 10 ग्रॅम सोने 6,110 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत आहेत.

सोने-चांदीचे आजचे दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),आता 22 कॅरेट सोने 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 68,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोनं आता 70 हजारांच्या खाली आलं आहे. त्यामुळे सराफा बाजारात आता ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे.

चांदीमध्ये देखील मोठी घसरण झाली (Gold-Silver Rate Today) आहे. 23 जुलै रोजी चांदी 3,500 रुपयांनी उतरली. 24 जुलै रोजी 500 रुपयांची घसरण झाली. 25 जुलै रोजी 3,000 रुपयांनी भाव खाली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,500 रुपये आहे.

कॅरेटचा भाव काय?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 68,131, 23 कॅरेट 67,858, 22 कॅरेट सोने 62,408 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट सोने आता 51,098 रुपये, 14 कॅरेट सोने 39,857 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क नसते. तसेच सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title : Gold-Silver Rate Today 27 july 2024

महत्त्वाच्या बातम्या-

दिग्दर्शक फराह खानला मातृशोक, मेनका इराणी यांचं निधन

अनेक महिने वापरताय एकच टूथब्रश?, मग ही बातमी वाचाच

‘भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या’, पंकजा मुंडेंच्या वाढदिवशी झळकले बॅनर

लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होणार?, विरोधकांच्या टीकेला सुधीर मुनगंटीवारांनी दिलं प्रत्युत्तर

Join WhatsApp Group

Join Now