आनंदवार्ता! बजेटपुर्वीच सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या आजच्या नव्या किमती

On: July 23, 2024 11:21 AM
Gold-Silver Rate Today 23 july 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 7 व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज 23 जुलैरोजी काही वेळातच अर्थसंकल्प सादर होईल. त्यामुळे सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. यात सर्व सामान्यांना दिलासा मिळणार काय?, याबाबत सर्वांनाच आशा लागली (Gold-Silver Rate Today) आहे.

त्यापूर्वीच सराफा बाजारात घसरणीचे सत्र दिसून आले. ग्राहकांना अंतरिम अर्थसंकल्पासारखाच पूर्ण बजेटपूर्वी दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम बजेट सादर झाले तेव्हा 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

आजच्या सोने-चांदीच्या किमती

आज देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होत (Gold-Silver Rate Today) आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हा भाव 22 कॅरेट सोने 67,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. 1 फब्रुवारी ते आज 23 जुलैचा विचार करता या पाच महिन्यांत 22 कॅरेट सोने 9,700 रुपयांनी तर तर 24 कॅरेट सोने 10,580 रुपयांनी महागले आहे.

पाच महिन्यांत सोने-चांदीच्या किमती वाढल्या

तसेच एक किलो चांदीचा भाव आज 23 जुलैरोजी 91,500 रुपये आहे. तर अंतरिम बजेटच्या दिवशी हा भाव किलोमागे 76,500 रुपये असा होता. म्हणजेच पाच महिन्यांत चांदीचे भाव तब्बल 15,000 रुपयांनी वाढले आहेत.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क नसते. तसेच सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title : Gold-Silver Rate Today 23 july 2024

महत्त्वाच्या बातम्या-

आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ होणार!

शरद पवारांनी घेतली CM शिंदेंची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

“मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना काढा”, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

“शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर, मग अजित पवार कोण?”

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आज तिसरा दिवस, सरकारच्या भूमिकेकडं सर्वांचंच लक्ष

Join WhatsApp Group

Join Now