दिवाळीपूर्वीच सोनं 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

On: October 19, 2024 9:43 AM
Gold-Silver Rate Today 19 October 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | गेल्या दोन महिन्यांपासून मौल्यवान धातु सोन्याने चांगलीच आघाडी घेतली आहे. ऑक्टोबर महिन्यात सोनं तेजीत दिसून आलं. आता दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले जाते. मात्र, सोन्याने ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे. पुढील काही दिवसांत सोने 80 हजारांचा टप्पा गाठणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. (Gold-Silver Rate Today)

ऐन सणासुदीला ग्राहकांचा मोठा खिसा कापल्या जाणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या ऑक्टोबर महिन्यात देखील मौल्यवान धातूने चांगलीच फटकेबाजी केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी सोनं 220 रुपयांनी स्वस्त झालं. 16 ऑक्टोबर रोजी त्यात पुन्हा 490 रुपयांची वाढ झाली.

आजचे सोने-चांदीचे दर

17 ऑक्टोबर रोजी त्यात 220 रुपयांची भर पडली. तर, काल 18 ऑक्टोबर रोजी सोन्याने 870 रुपयांची मुसंडी मारली. आज आठवड्याच्या शेवटी म्हणजेच 19 ऑक्टोबररोजी देखील सोन्याने आघाडी घेतली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold-Silver Rate Today)

तर, चांदीत मागील 20 दिवसांत कोणतीही घडामोड दिसली नाही. 5 ऑक्टोबरला चांदी 2 हजारांनी वधारली तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. पुन्हा 11 ऑक्टोबरला चांदीत 2 हजारांची वाढ झाली.तर, काल 18 ऑक्टोबररोजी चांदी 2 हजारांनी महाग झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,000 रुपये झाला आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,410, 23 कॅरेट 77,100, 22 कॅरेट सोने 70,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,058 रुपये, 14 कॅरेट सोने 45,285 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

News Title – Gold-Silver Rate Today 19 October 2024

महत्त्वाच्या बातम्या-

शुक्र आणि शनीची युती ‘या’ 3 राशींना करणार धनवान, डिसेंबर महिना ठरणार भाग्याचा!

“सलमानने कधी साधं झुरळही मारलं नाही, तो माफी मागणार मागणार नाही”

आज शनीदेव कोणत्या राशींवर असणार मेहेरबान?, वाचा राशी भविष्य

आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर, भरपत्रकार परिषदेत घडलं असं काही की…

कियाची जबरदस्त फीचर्ससह कार बाजारात लाँच; जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp Group

Join Now