गुड न्यूज! सोने-चांदीत आली स्वताई, ‘इतक्या’ हजारांची झाली घसरण

On: January 15, 2025 12:44 PM
Today Gold Rate
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | जानेवारी महिन्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून सोने-चांदीत दरवाढ दिसून आली. दोन्ही धातूंनी या दिवसांत मोठी आघाडी घेतली. मात्र, या आठवड्यात ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. जळगावातील सराफा बाजारात चांदीच्या भावात संक्रांतीला एक हजार 800 रुपयांची घसरण झाली. सोन्यात देखील घसरण पाहायला मिळाली. (Gold-Silver Rate Today )

आजचे सोने-चांदीचे रेट-

शनिवारी 91 हजार 300 रुपयांवर असलेली चांदी काल, 14 जानेवारीरोजी 1800 रुपयांची घसरण होऊन 89 हजार 500 रुपये प्रति किलोवर आली. तर, शनिवारी 78 हजार 600 रुपयांवर असलेले सोने सोमवारी 200 रुपयांनी महाग झाले. मात्र, आज 15 जानेवारीरोजी घसरणीचे संकेत मिळत आहेत.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 23 कॅरेट सोने 77,716, 22 कॅरेट सोने 71,474 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 58,521 रुपये, 14 कॅरेट सोने 45,646 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले  आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 15 January 2025

महत्त्वाच्या बातम्या-

पत्नी, ड्रायव्हरच्या नावे कोटींचे फ्लॅट; वाल्मिक कराडची प्रॉपर्टी पाहून थक्क व्हाल

पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

मकोका लागताच वाल्मिक कराडचा आणखी एक धक्कादायक मॅटर समोर!

अजित दादांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का?, बीडमध्ये मोठ्या घडामोडी

Join WhatsApp Group

Join Now