आनंदवार्ता! लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; 1 ग्रॅमसाठी मोजा फक्त ‘इतके’ रुपये

On: November 14, 2024 1:51 PM
Gold Price
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | हिंदू धर्मात तुळशी विवाहाला मोठे महत्व आहे. कारण, यानंतरच लग्न मुहूर्ताला सुरुवात होत असते. तुळशी विवाह काल पार पडला आहे. यानंतर सराफा बाजारातही सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. लग्नसराईचे दिवस सुरू होताच सोन्याचे दर कोसळल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आठवड्यात सोन्याचे दर हे खाली आल्याचे दिसून येत आहे. (Gold-Silver Rate Today)

आज 14 नोव्हेंबररोजी देखील सोन्यात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर दिवाळीपेक्षा आता उतरणीला लागले आहेत. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरुवात होते. या काळात सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. सराफा बाजारात सध्या वर-वधुची दागिने खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा 1,200 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं सोनं आज 75,650 रुपयांवर पोहोचले आहे.

तर, आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 69,350 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 75,650 रुपयांवर पोहोचलं आहे. तसेच, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांची घट झाली असून सोनं 56,740 रुपयांवर पोहोचलं आहे. (Gold-Silver Rate Today)

कॅरेटनुसार जाणून घ्या सोन्याचे भाव

10 ग्रॅम सोन्यासाठी 22 कॅरेटची किंमत 69,350 रुपये आहे
10 ग्रॅम सोन्यासाठी 24 कॅरेटची किंमत 75,650 रुपये आहे
10 ग्रॅम सोन्यासाठी 18 कॅरेटची किंमत 57,740 रुपये आहे

1 ग्रॅम सोन्यासाठी 22 कॅरेटची किंमत 6,935 रुपये आहे
1 ग्रॅम सोन्यासाठी 24 कॅरेटची किंमत 7, 565 रुपये आहे
1 ग्रॅम सोन्यासाठी 18 कॅरेटची किंमत 5, 674 रुपये आहे (Gold-Silver Rate Today)

8 ग्रॅम सोन्यासाठी 22 कॅरेटची किंमत 55,480 रुपये आहे
8 ग्रॅम सोन्यासाठी 24 कॅरेटची किंमत 60,520 रुपये आहे
8 ग्रॅम सोन्यासाठी 18 कॅरेटची किंमत 45,392 रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 14 November 2024

महत्त्वाच्या बातम्या-

“आम्ही धर्मयुद्ध लढत बसू अन् तिकडे अमृता फडणवीस रील बनवत..”; ‘या’ नेत्याचा टोला

ऐन निवडणुकीत दुःखद बातमी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं निधन

“तुम्ही ज्यावर प्रेम केलं, तो सूरज आता तसा नाही…”; कोकण हार्टेड गर्लने वादावर मौन सोडलं

मोठी बातमी! नितीन राऊत यांच्या कारचा भीषण अपघात, प्रचारावरून परततानाच..

“सर्वांनी मिळून माझा लोकसभेत पराभव केला”; नवनीत राणांचं महायुतीलाच आव्हान

Join WhatsApp Group

Join Now