गेल्यावर्षी 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने मिळणारं सोनं आज पोहोचलं ‘इतक्या’ हजारांवर!

On: December 13, 2024 11:03 AM
Gold Rate
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | देशभरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात वधू आणि वर या दोन्ही पक्षाकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. मात्र, यंदाच्या वर्षी सोन्याने ग्राहकांचा खिशा चांगलाच खाली केलाय. यावर्षी सोने दरवाढीने अनेक विक्रम तोडले आहेत. मागील एक वर्षाचा विचार केल्यास मौल्यवान धातू सोन्यात तब्बल 20 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. (Gold-Silver Rate Today)

मागच्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजेच 13 डिसेंबर 2023 रोजी 22 कॅरेट सोने 57,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,280 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आजचे लेटेस्ट दर पाहिले तर, आज 13 डिसेंबर 2024 रोजी 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. म्हणजेच मागच्या वर्षी 60 हजार रुपये 10 ग्रॅम सोने यंदा तब्बल 80 हजारांवर पोहोचले आहे.

आजचे सोने-चांदीचे दर

तर, चांदी सध्या 96,600 रुपये किलो आहे. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी चांदीचे दर हे 75 हजार रुपये किलो होते. म्हणजेच या एक वर्षात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी मोठी आघाडी घेतली. यावेळी दरवाढीने अनेक विक्रम केले आणि तोडले देखील.

या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याने जवळपास दोन हजार रुपयांची उसळी घेतली. 9 डिसेंबर रोजी सोने 160, 10 डिसेंबरला 820 रुपये तर 11 डिसेंबर रोजी 870 रुपयांनी सोने महाग झाले. मात्र, आज सकाळच्या सत्रात सोन्यात नरमाई दिसून आली. त्यामुळे ग्राहकांना काही अंशी तरी दिलासा मिळाला. (Gold-Silver Rate Today)

आजचे 14 ते 24 कॅरेटचे भाव-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,147, 23 कॅरेट 77,834, 22 कॅरेट सोने 71,583 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 58,610 रुपये, 14 कॅरेट सोने 45,716 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

News Title – Gold-Silver Rate Today 13 December 2024

महत्त्वाच्या बातम्या-

भाजप अजितदादा-एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का?, आतली बातमी समोर

आज भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

पवारसाहेब आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार?

अजितदादांची धाकधूक वाढली! भाजप अजितदादांना देणार दे धक्का?

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! यापुढे ‘एक देश, एक निवडणूक’ …?

Join WhatsApp Group

Join Now