ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांवर, चांदीचेही दर वाढले

On: August 13, 2024 11:53 AM
Pune Gold Theft
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | या आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. आज सोन्याचे भाव वाढले आहेत. मागच्या आठवड्यात सोनं हजार रुपयांनी वाढलं होतं. तर, चांदी देखील 1600 रुपयांनी वाढली होती. आज सकाळी (13 ऑगस्ट) पुन्हा दर वाढीचे संकेत दिसून (Gold-Silver Rate Today) आले.

काल 12 ऑगस्टरोजी सोने 270 रुपयांनी वधारले. तर आज सकाळच्या सत्रात सोन्यामध्ये पुन्हा दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोने-चांदीचे दर

सोनं पुन्हा एकदा 70 हजारांवर आलं आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सोनं पहिल्यांदाच 70 हजारांच्या पुढे गेलं होतं. या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात अनेक विक्रम नोंदवले गेले. त्यानंतर जुलै महिन्यात दर 70 हजारांच्या खाली आल्याचं दिसून आलं. तब्बल दोन महिन्यांनी ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात सतत दरवाढीचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या आठवड्याच्या (Gold-Silver Rate Today) सुरुवातीला चांदी 4200 रुपयांनी उतरली होती. त्यानंतर 1600 रुपयांनी किंमती वधारल्या. काल 12 ऑगस्ट रोजी चांदी किलोमागे 600 रुपयांनी उतरली. आज सकाळच्या सत्रात त्यात पुन्हा घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 82,500 रुपये आहे. चांदीने काही अंशी दिलासा दिला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69890, 23 कॅरेट 69,610, 22 कॅरेट सोने 64,019 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,418 रुपये, 14 कॅरेट सोने (Gold-Silver Rate Today) 40,886 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव-

दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

News Title : Gold-Silver Rate Today 13 August 2024

महत्त्वाच्या बातम्या-

‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’, राखी पौर्णिमेनिमित भाजपचा खास प्लॅन

या राशीच्या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवा अन्यथा…

Diabetes आणि BP कंट्रोलमध्ये ठेवतील ‘हे’ 5 पदार्थ; वजनही होईल कमी

‘या लोकांसोबत तुला झोपायला लागेल’, सई ताम्हणकरच्या खुलाशाने खळबळ!

“..याची किंमत मोजावी लागली”; घटस्फोटाच्या चर्चेवर अखेर अभिषेकनं सोडलं मौन

Join WhatsApp Group

Join Now