Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीच्या भावाने गेल्या तीन दिवसांत प्रचंड झेप घेतली आहे. सराफा बाजारात एका दिवसातच सोनं तब्बल ५ हजार रुपयांनी महागलं आहे. यामुळे सामान्य खरेदीदारांपेक्षा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, चांदीनेही दमदार कामगिरी कायम ठेवली असून, किंमतींनी विक्रम मोडण्याचा क्रम सुरूच आहे. (Today Gold Silver Price)
सोन्याचा दरवाढीचा धडाका :
गुडरिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबरला २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६० रुपयांनी, ९ सप्टेंबरला १३६ रुपयांनी तर १० सप्टेंबरला २२๐ रुपयांनी वाढला. आज सकाळच्या सत्रातदेखील सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असून, २४ कॅरेट सोन्याचा भाव १,१०,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,०१,४६० रुपयांवर पोहोचला आहे. (Gold Silver Price Today)
सोन्याबरोबरच चांदीनेही मोठी उसळी घेतली आहे. ८ सप्टेंबरला चांदी १००० रुपयांनी स्वस्त झाली होती. पण लगेचच ९ सप्टेंबरला तिने तब्बल ३ हजार रुपयांची झेप घेतली. आज सकाळच्या सत्रात एक किलो चांदीचा भाव १,२९,००० रुपयांवर गेला आहे. गुंतवणूकदारांसाठी हा मोठा फायदा ठरत असून, चांदीचा वेगवान झपाटा कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Gold Silver Price Today | IBJA नुसार ताजे दर :
२४ कॅरेट सोने: ₹१,०९,६४०
२३ कॅरेट सोने: ₹१,०९,२००
२२ कॅरेट सोने: ₹१,००,४३०
१८ कॅरेट सोने: ₹८२,२३०
१४ कॅरेट सोने: ₹६४,१४०
१ किलो चांदी: ₹१,२४,५९४
वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कर व शुल्क नसल्याने तेथे किंमती तुलनेने कमी असतात. सराफा बाजारात मात्र कर व शुल्कामुळे किंमती जास्त दिसतात.






