भारताचं नशीब उजळलं! ‘या’ राज्यात सापडले सोन्याचे साठे

On: August 19, 2025 5:28 PM
India Gold Mining
---Advertisement---

India Gold Mining | भारतासाठी आनंदाची बातमी आहे. ओडिशा राज्यात सोन्याचे नवे साठे सापडल्याची माहिती भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने (GSI) दिली आहे. देवगड (आदासा-रामपल्ली), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट या भागांत सोन्याचे साठे आढळले आहेत. याशिवाय मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध जिल्ह्यांत सोन्याचा शोध सुरू आहे. मार्च 2025 मध्ये खाणमंत्री बिभूती भूषण जेना यांनी विधानसभेत याची माहिती दिली होती. (Odisa Gold Mining)

किती सोने मिळणार आणि काय होणार परिणाम? :

अद्याप या साठ्यांतून किती सोने मिळेल याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. मात्र भूगर्भीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार येथे 10 ते 20 मेट्रिक टन सोनं असू शकतं. हा आकडा भारत दरवर्षी आयात करत असलेल्या सोन्याच्या तुलनेत खूपच कमी आहे, कारण भारताने 2024-25 मध्ये जवळपास 700-800 मेट्रिक टन सोने आयात केलं होतं. तरीही, या शोधामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळणार आहे.

2020 पर्यंत भारताचं वार्षिक सोनं उत्पादन फक्त 1.6 टन इतकं होतं. त्यामुळे ओडिशातील हे नवे साठे भारताच्या खाणकाम क्षेत्रासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहेत. जरी हे साठे आयातीवरील अवलंबित्व पूर्णपणे कमी करणार नसले, तरी सोन्याच्या क्षेत्रातील आत्मनिर्भरतेकडे भारत एक पाऊल पुढे टाकत आहे. (India Gold Mining)

India Gold Mining | खाणकाम आणि आर्थिक फायदा :

ओडिशा सरकार, ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन (OMC) आणि GSI यांनी या सोन्याचं व्यावसायिकीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे. देवगड येथील पहिल्या सोन्याच्या खाणीचा ब्लॉक लिलावासाठी तयार करण्यात येत आहे. या लिलावातून राज्य सरकारच्या महसूलात वाढ होणार आहे.

सोन्याच्या खाणींचा विकास केवळ महसूलापुरता मर्यादित राहणार नाही, तर स्थानिक पायाभूत सुविधा, वाहतूक, सेवा आणि रोजगार क्षेत्रांमध्येही प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे या खाणींमुळे प्रादेशिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.

India Gold Mining | ओडिशा – खनिज संपत्तीचा महाकेंद्र

ओडिशा आधीपासूनच खनिज संपत्तीनं समृद्ध राज्य आहे. भारतातील क्रोमाईटचे 96 टक्के, बॉक्साईटचे 52 टक्के आणि लोखंडी खनिजाचे 33 टक्के साठे ओडिशात आहेत. आता सोन्याचे साठे मिळाल्याने ओडिशा खनिज संपत्तीच्या नकाशावर आणखी महत्त्वाचं ठिकाण ठरणार आहे.

या साठ्यांचा फायदा केवळ राज्यालाच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही होणार आहे. स्थानिक उद्योग, निर्यात आणि रोजगाराच्या संधींमुळे ओडिशा देशाच्या आर्थिक विकासाचा एक प्रमुख केंद्रबिंदू ठरू शकतो.

News Title: Gold Reserves Found in Odisha: India’s Economy and Jobs to Get a Boost from New Discoveries

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now