Gold Prices | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती निवळल्याचे संकेत मिळताच आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या (Gold) दरात लक्षणीय चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या केवळ ४८ तासांत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम तब्बल ८,००० रुपयांनी घसरला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या बातमीनंतर पहिल्या दिवशी ४,००० रुपयांनी कमी झालेले सोने, सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा ४,००० रुपयांनी खाली आले. रविवारी, ११ मे रोजी, सोन्याचा भाव ९६,७१० रुपये प्रति १० ग्रॅम होता, तो आता आणखी ४,००० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ९२,९१० रुपयांवर आला आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि सोन्याचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ करासंदर्भातील सकारात्मक चर्चेनंतर सोन्याच्या किमतींवर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावाने प्रति १० ग्रॅम एक लाखाचा टप्पा ओलांडल्यामुळे ग्राहकांमध्ये सोने खरेदीबद्दल साशंकता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने कमी होत असल्याने, अनेकजण पुन्हा सोने खरेदी करण्याचा विचार करू लागले आहेत.
आजचा सोन्याचा भाव आणि बाजारपेठेतील स्थिती
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आज, सोमवार, १२ मे रोजीच्या आकडेवारीनुसार, मुंबई आणि पुणे येथील सराफा बाजारात १० ग्रॅम २४ कॅरेट (24 Carat) सोन्याची किंमत ९२,७१० रुपये इतकी झाली आहे. तर, २२ कॅरेट (22 Carat) सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८५,२८७ रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात १,००,५०० रुपये प्रति १० ग्रॅम असलेला सोन्याचा भाव रविवारी ९६,७१० रुपयांवर आला होता आणि सोमवारी तो आणखी ४,००० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅमसाठी ९२,९१० ते ९३,०१० रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे. सोन्याच्या भावात सध्या काही प्रमाणात चढउतार सुरू असल्याने, अनेक ग्राहक ‘वेट अँड वॉच’ म्हणजेच ‘थांबा आणि पाहा’ या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.
सोन्याच्या दरातील घसरणीची कारणे
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणातील बदलांनंतर संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (Market) मोठी उलथापालथ झाली होती. जगभरातील शेअर मार्केट कोसळल्यानंतर सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता आणि देशांतर्गत सोन्याच्या किमतीही वाढल्या होत्या. त्यानंतर भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील लष्करी संघर्षाला सुरुवात झाली होती. भारत-पाकिस्तान (India-Pakistan) संघर्ष आणि बँक ऑफ इंग्लंडच्या (Bank of England) चलनविषयक धोरण (Monetary Policy) निर्णयामुळे गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी (Silver) या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार दिसून आले. भारतीय (Indian) लष्कराच्या (Indian Army) ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे (Operation Sindoor) दोन्ही शेजारील राष्ट्रांमधील तणाव वाढला होता, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूंमध्ये सुरक्षित गुंतवणूक (Safe Haven Investment) म्हणून पैसे गुंतवले होते.
आता एकीकडे भारत-पाकिस्तान तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच, अमेरिकेने (United States of America) चीनमधील (China) वस्तूंवरील आयात शुल्क (Import Duty) १४५ टक्क्यांवरून कमी करून ३० टक्क्यांपर्यंत आणले आहे. हे बदल ९० दिवसांसाठी करण्यात आले असून, चीननेही अमेरिकन (American) वस्तूंवरील शुल्क १२५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत ९० दिवसांसाठी कमी केले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचा थेट परिणाम आजच्या सोन्याच्या दरातील घसरणीवर झाल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.
Title : Gold Prices Plunge By Rs 8000 In 48 Hours






