Today Gold Price | गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ होत असून आज पुन्हा एकदा दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,०४,६६२ रुपयांवर तर चांदी प्रति किलो १,२३,२८१ रुपयांवर ट्रेड करत आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. गेल्या दोन दिवसांतच सोनं ११०० रुपयांनी तर चांदी तब्बल ३,००० रुपयांनी महागली आहे. (Today Gold Price)
सोनं-चांदीचे आजचे दर :
२४ कॅरेट सोनं: ₹१,०४,६६२ प्रति १० ग्रॅम
२३ कॅरेट सोनं: ₹१,०४,२४३ प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट सोनं: ₹९५,८७० प्रति १० ग्रॅम
१८ कॅरेट सोनं: ₹७८,४९७ प्रति १० ग्रॅम
१४ कॅरेट सोनं: ₹६१,२२७ प्रति १० ग्रॅम
चांदी (९९९ शुद्धता): ₹१,२३,२८१ प्रति किलो
Today Gold Price | दिल्ली आणि स्थानिक बाजारातील स्थिती :
दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या किंमतीत तब्बल ₹१,००० रुपयांची वाढ झाली. सर्व करांसह सोनं १० ग्रॅममागे ₹१,०५,६७० च्या नव्या उच्चांकावर पोहोचलं. त्याचप्रमाणे चांदीही ₹१,२६,००० प्रति किलोच्या सर्वकालीन उच्चांकावर गेली आहे. ही सलग सहावी वेळ आहे की सोन्याच्या किंमती वाढत आहेत. (Today Gold Price)
जळगावच्या सराफा बाजारातही मंगळवारी विक्रमी वाढ झाली. जीएसटीसह सोनं प्रति तोळा ₹१,०७,७३८ वर पोहोचलं आहे. तर चांदी ₹१,२७,७२० प्रति किलोच्या उच्चांकावर गेली आहे.






