बँक लॉकरमध्ये सोनं किती ठेवता येतं?; आरबीआयचा नियम काय सांगतो, जाणून घ्या

On: November 2, 2025 3:33 PM
Lost Your Bank Locker Keys
---Advertisement---

Bank Locker Rules | भारतामध्ये सोने (Gold) हे सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. चोरीच्या भीतीने अनेक जण दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेच्या लॉकरचा (Bank Locker) वापर करतात. यासाठी बँका ठराविक शुल्क आकारून दागिन्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतात. मात्र, या लॉकरमध्ये नेमके किती सोने ठेवता येते, याबद्दल रिझर्व्ह बँकेचे (RBI) नियम काय आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

घरात किती सोनं ठेवता येतं?

बँकेच्या लॉकरमधील मर्यादेपूर्वी, आयकर कायद्यानुसार (Income Tax Law) घरात सोने ठेवण्याचे काही नियम आहेत. एका विवाहित महिलेला ५०० ग्रॅम (म्हणजेच ५० तोळे) सोने बाळगण्याची मुभा आहे. अविवाहित महिलांसाठी ही मर्यादा २५० ग्रॅम (२५ तोळे) आहे.

पुरुषांसाठी हा नियम वेगळा असून, ते १०० ग्रॅम (१० तोळे) सोने घरी ठेवू शकतात. उदाहरणार्थ, एका कुटुंबात विवाहित पुरुष (१०० ग्रॅम) आणि त्याची पत्नी (५०० ग्रॅम) मिळून एकूण ६०० ग्रॅम सोने कायदेशीररित्या घरी ठेवू शकतात.

बँक लॉकरसाठी आरबीआयचा नियम काय?

अनेकांना वाटते की घरात सोनं ठेवण्याप्रमाणेच बँक लॉकरमध्येही सोनं ठेवण्यावर मर्यादा असेल, पण तसे नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) (Reserve Bank of India) माहितीनुसार, बँकेच्या लॉकरमध्ये सोने ठेवण्यावर कोणतीही कमाल मर्यादा (No Upper Limit) घालून देण्यात आलेली नाही. ग्राहक त्यांच्या लॉकरच्या क्षमतेनुसार कितीही सोने ठेवू शकतात.

मात्र, प्रत्येक बँकेचे स्वतःचे अंतर्गत धोरण वेगळे असू शकते. तसेच, तुम्ही लॉकरमध्ये जे सोनं ठेवत आहात, ते कायदेशीर मार्गाने खरेदी केल्याचे पुरावे (बिले) तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. दिवाळीनंतर बँकिंग नियमात बदल झाला असून, आता लॉकरधारकाला नॉमिनेशन करणे (प्राधान्य यादी देणे) बंधनकारक झाले आहे. लॉकरधारकाच्या मृत्यूनंतर कायदेशीर वाद टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

News Title- Gold Bank Locker Rules Explained

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now