सोने-चांदी खरेदीची सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचे दर

On: September 18, 2025 10:25 AM
Gold and Silver Price
---Advertisement---

Gold and Silver Price | जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली. त्यानंतर सोन्याने एका दिवसात नवीन उच्चांक गाठला, मात्र लगेचच मोठ्या प्रमाणात पडझड झाली. (Today Gold and Silver Price)

सोन्याचा 45 वर्षांतील रेकॉर्ड :

बुधवारी सोनं जागतिक बाजारात तब्बल $3,707.57/oz या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, फेड चेअरमन पॉवेल यांच्या वक्तव्यानंतर गुरुवारी सोनं १ टक्क्यांनी घसरून $3,690/oz पर्यंत खाली आलं. सोन्याने 1980 नंतर पहिल्यांदाच इतका उच्चांक गाठत ऐतिहासिक रेकॉर्ड केला होता. 2025 मध्ये सोन्याच्या किमती 40% ने उसळल्या आहेत, ज्यामुळे S&P 500 सारख्या इंडेक्सलाही मागे टाकलं आहे. (Today Gold and Silver Price)

दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी सोन्याच्या भावात घसरण झाली. 24 कॅरेट 1 ग्रॅम सोने 54 रुपयांनी घसरून आता 11,117 रुपये झाले आहे. 22 कॅरेट सोनं 10,190 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 8,338 रुपये प्रति ग्रॅम आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोनं 1,09,730 रुपये, तर 22 कॅरेट सोनं 1,00,520 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. 18 कॅरेट सोनं 82,300 रुपये आणि 14 कॅरेट सोनं 64,190 रुपये इतकं आहे.

Gold and Silver Price | चांदीतही मोठी पडझड :

सोनेच नव्हे तर चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात 3 हजारांची उसळी घेतल्यानंतर, 16 सप्टेंबरला 1,000 रुपयांची वाढ दिसली होती.

मात्र 17 सप्टेंबरला 2,000 रुपयांची घसरण झाली आणि आज सकाळी आणखी 1,000 रुपयांची पडझड नोंदवली गेली. तसेच एक किलो चांदीचा भाव 1,31,000 रुपये इतका आहे. तर IBJA च्या आकडेवारीनुसार, चांदी 1,25,756 रुपये प्रति किलो झाली आहे.

News Title: Gold and Silver Price Today: Biggest Fall Since 1980, Gold Hits Record and Crashes

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now