तिने ऑफिसमध्ये जे पाहिलं… राज कुंद्राबद्दल सर्वात मोठा खुलासा

On: December 10, 2024 2:39 PM
Shilpa Shetty
---Advertisement---

Raj Kundra l अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठ हिची ईडीने अश्लील व्हिडीओ निर्मितीच्या आरोपांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सोमवारी (9 डिसेंबर) तब्बल सात तास चौकशी केली आहे. मात्र आज देखील गहना वशिष्ठला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. त्यानंतर आज गहना वशिष्ठ ईडी कार्यालयात दाखल झाली. मात्र या दरम्यान तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

गहना वशिष्ठने केले धक्कादायक खुलासे :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अश्लील व्हिडीओ निर्मितीच्या आरोपांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गहना वशिष्ठच्या सोबतच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचं देखील नाव पुढे आलं आहे. तसेच आज या चौकशीदरम्यान गहनाने राज कुंद्राविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

चौकशीनंतर गहना म्हणाली की, “मी नेहमी हेच सांगत आले आहे की मी कधीच उद्योगपती राज कुंद्राशी थेट संवाद साधला नाही. कारण आमचा संवाद हा उमेश कामतच्या माध्यमातूनच व्हायचा. परंतु, आम्ही मिटींगसाठी आम्ही ज्याठिकाणी भेटायचो, त्याच्या प्रवेशद्वारावर ‘वियान इंडस्ट्रीज’ असं नाव देखील लिहिलेलं होतं. त्याचप्रमाणे आम्हाला तिथे उद्योगपती राज कुंद्राच्या कुटुंबाचा फोटो पहायला मिळाला होता. त्यामुळे ते ऑफिस राज कुंद्राचं असावं असा माझा एक अंदाज आहे. दरम्यान, कोणी अशाप्रकारे राज कुंद्राच्या कुटुंबाचा फोटो ऑफिसमध्ये का लावेल?” असा प्रश्न देखील तिने उपस्थित केला आहे.

Raj Kundra l राज कुंद्राच्या अडचणी वाढणार? :

यासंदर्भात ती पुढे म्हणाली, “हॉटशॉट्स हे नोव्हेंबर 2020 मध्येच बंद झालं होतं. त्यानंतर मी जानेवारी 2021 मध्ये पहिल्यांदा उद्योगपती राज कुंद्राला भेटले होते. तेव्हा राज कुंद्रा हे बॉलिफेम आणि जल्दीलाइफ हे दोन ॲप लाँच करणार होते. याशिवाय आमची भेट देखील त्याचसंदर्भात झाली होती. तसेच त्यावेळी शिल्पा शेट्टी त्याची ब्रँड ॲम्बेसेडर होणार होती.” असं देखील गहना वशिष्ठ म्हणाली आहे. मात्र आता गहना वशिष्ठच्या या खुलाशांमुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्यासाची शक्यता आहे.

News Title :  Gehana Vashisht makes shocking claims in Raj Kundra 

महत्वाच्या बातम्या –

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार

सोन्याची पुन्हा गरुड भरारी, ‘इतक्या’ रुपयांनी झाली दरवाढ

भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण, नंतर हत्या! नेमकं काय घडलं

कुर्ला अपघातातील चालकाबाबत धक्कादायक खुलासा समोर!

ब्रेक फेल की… कुर्ल्यातील अपघातामागचं खरं कारण काय?

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now