पुण्यात जीबीएसचं थैमान, ‘या’ वयोगटातील लोकांना सर्वाधिक धोका

On: January 31, 2025 11:28 AM
Pune News
---Advertisement---

Pune News l शहरातील लहान मुले आणि तरुणांना सर्वाधिक ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ची (जीबीएस) लागण झाली असून, आतापर्यंत आढळलेल्या 130 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण (30) हे 20 ते 29 या वयोगटातील आहेत. शून्य ते नऊ या वयोगटातील 22 मुलांना ‘जीबीएस’ झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 130 संशयित रुग्णांची नोंद झाली असून, पैकी 73 जणांना ‘जीबीएस’चे निदान झाले आहे. यातील 25 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात आणि 74 रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या परिसरात आढळले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात 13 आणि ग्रामीणमध्ये नऊ रुग्णांची नोंद झाली आहे. उर्वरित नऊ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असून, त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.

Pune News  l आरोग्य विभागाचे सचिव पुण्यात :

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ‘जीबीएस’चे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. डॉ. विनायक यांनी सकाळी ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे’ला (एनआयव्ही) भेट देऊन तेथील तपासण्यांची माहिती घेतली.

नवीन एकाही संशयित रुग्णाची गुरुवारी नोंद झाली नाही. तीन संशयित रुग्ण बुधवारी आढळून आले. त्यांची नोंद गुरुवारी करण्यात आल्याने 130 रुग्ण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. शहरातील विविध रुग्णालयांतील 20 रुग्णांवर मध्ये गुरुवारी रात्रीपर्यंत व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

थोडक्यात, पुणे शहरात ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव वाढत असून, तरुणांमध्ये या आजाराचा संसर्ग सर्वाधिक दिसून येत आहे. आरोग्य विभागाने सतर्कतेचे आदेश दिले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

News Title: GBS-Threat-In-Pune-Youth-Most-Affected-30-Patients-In-20-29-Age-Group

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now