Satara News : कोरोना महामारीतून सावरत असतानाच, आता गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) म्हणजेच जीबीएस (GBS) या नव्या आजाराने पुणेकरांची झोप उडवली आहे. पुण्यातील प्रादुर्भावानंतर आता या आजाराने साताऱ्यातही प्रवेश केल्याने चिंता आणखी वाढली आहे.
सातारा जिल्ह्यात या आजाराचे चार संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर (High Alert) आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात चार संशयित रुग्ण
Satara जिल्ह्यात जीबीएस (GBS) चे चार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या चारही रुग्णांचे वय १५ वर्षांपेक्षा कमी आहे. यांपैकी दोघांवर सातारा शासकीय रुग्णालयात (Government Hospital), एकावर खासगी रुग्णालयात (Private Hospital) तर एकावर कराड (Karad) येथील कृष्णा रुग्णालयात (Krishna Hospital) उपचार सुरू आहेत. या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही चारही मुले जिल्ह्याच्या विविध भागातील आहेत. या मुलांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असून प्रयोगशाळेतील अहवालानंतरच जीबीएस (GBS) चे निदान स्पष्ट होईल.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे (Mahesh Khalipe) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अचानक हातपाय लुळे पडल्यास त्वरित शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. तसेच, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले आहे.
पुण्यातील विहीर वादाच्या भोवऱ्यात
दुसरीकडे, पुण्यातील नांदेड (Nanded) गावातील पाणीपुरवठा करणारी विहीर सध्या राजकारण्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या विहिरीची पाहणी करण्यासाठी दररोज कोणी ना कोणी राजकीय व्यक्ती भेट देत आहे. गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील या विहिरीला भेट दिली आणि पाण्याचे नमुने (Water Sample) तपासले. तसेच, पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून जीबीएस (GBS) रुग्णांचे महागडे हॉस्पीटल बील सरसकट माफ करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
पुण्यातील याच परिसरात तब्बल ७३ रुग्ण आढळून आल्याने, या विहिरीतूनच दूषित पाण्याचा पुरवठा झाला असल्याचा संशय बळावला आहे. मात्र, पालिका अधिकारी हे मान्य करण्यास तयार नाहीत. १४ जानेवारीपासून पसरलेल्या या साथीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही.






