‘जीबीएस’ग्रस्त गावांना शुद्ध पाणी मिळणं कठीणच?; पाणीपुरवठा योजना रखडल्या

On: January 29, 2025 11:55 AM
Pune News
---Advertisement---

Pune News l महापालिकेत (Municipal Corporation) समाविष्ट झालेल्या ३४ गावांना दररोज ३२१ दशलक्ष लिटर (एमएलडी) (MLD) पाण्याची गरज आहे. मात्र, महापालिकेकडून जलवाहिनीद्वारे ९४ एमएलडी आणि टँकरद्वारे (Tanker) ७ एमएलडीच पाणीपुरवठा (Water Supply) केला जातो. परिणामी येथील रहिवाशांना टँकरसह अन्य स्रोतांद्वारे पाणी मिळवून तहान भागवावी लागत आहे.

‘जीबीएस’चा (GBS) सर्वाधिक फटका बसलेल्या अकरा गावांसाठी महापालिकेने यापूर्वीच पाणीपुरवठा योजनेचे आराखडे तयार केले आहेत. त्यानुसार, या गावांना दोन अब्ज घनफूट (टीएमसी) (TMC) पाण्याची आवश्यकता आहे; परंतु राज्य सरकारने (State Government) त्याचा कोटा मंजूर केला नसल्याने या पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत.

सिंहगड रस्ता, खडकवासला, किरकटवाडी, नांदेडगाव, नांदेड सिटी, धायरी आणि आंबेगाव या परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) ८० रुग्ण आढळल्याने हा भाग बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

नांदेड गावातील या जुन्या विहिरीत महापालिकेतर्फे खडकवासला धरणातील प्रक्रिया न केलेले पाणी आणले जाते. तेथून परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो.

Pune News l ‘डीएसके विश्व’ला सर्वाधिक फटका :

‘डीएसके विश्व’ (DSK Vishwa) आणि परिसराला वारंगणे मळा (Varangane Mala) येथील विहिरीवरून तसेच नांदेड (Nanded) गावातील विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत होता. या विहिरीवरून पाणी पुरवठा होत असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. अशुद्ध पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना पोटदुखी, मळमळ याचा त्रास होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी होत्या.

पालिकेने थांबवले शुद्धीकरण? :

नांदेड ग्रामपंचायतीकडून (Grampanchayat) या विहिरीतूनच पूर्वीही पाणी पुरवले जायचे. विहिरीतून पाणी घेताना या जलवाहिनीत पाण्याच्या शुद्धीकरणासाठीचे (Water Purification) द्रावण ठरावीक सेकंदांनी पडत राहील, अशी व्यवस्था ग्रामपंचायतींनी केली होती. मात्र, गावे महापालिकेत आल्यानंतर महापालिकेने ही यंत्रणा काढून टाकली. त्यानंतर अधूनमधून शुद्धीकरणाच्या नावाखाली ब्लिचिंग पावडर (Bleaching Powder) टाकली जाते. त्यातही नियमितता नसल्याने विहिरीतील पाणी दूषित होत आहे, असा दावा रहिवाशांनी केला.

उपनगरांमध्ये शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिका प्रशासनासह टँकर लॉबीविरोधात स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

News Title : GBS Disease in pune 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now