मुंबईत ‘जीबीएस’चा धोका! महापालिका अलर्ट; उचललं मोठं पाऊल

On: January 29, 2025 9:44 AM
Mumbai GBS
---Advertisement---

Mumbai GBS l पुणे (Pune) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome – GBS) या आजाराचे १११ रुग्ण आढळले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत (Mumbai) या आजाराचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. तरीही, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाने (Health Department) सद्य:स्थितीचा आढावा घेत शहरातील महापालिका रुग्णालयांमध्ये (Municipal Hospitals) १५० आयसीयू बेड्सची (ICU Beds) व्यवस्था केली आहे.

जीबीएस रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात (Government Hospitals) विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिल्या आहेत. फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जीबीएसबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) समाविष्ट आहेत.

जीबीएससाठी औषधे उपलब्ध, आरोग्य विभागाला सूचना :

जीबीएससाठी देण्यात येणारी सर्व औषधे (Medicines) शहरात उपलब्ध आहेत. मुंबईतील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत (Private Hospitals) कोणताही नवीन जीबीएस रुग्णाची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग (Epidemic) कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Mumbai GBS l घाबरून न जाण्याचे आवाहन :

हा ऑटोइम्यून (Autoimmune) आजार असून, यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) स्वतःच्या चेतासंस्थेवर (Nervous System) हल्ला करते. त्यामुळे स्नायू (Muscles) कमजोर होतात आणि गंभीर रुग्णांमध्ये पक्षाघातही (Paralysis) होऊ शकतो. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर (Infection) होतो. त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते.

“नागरिकांनी घाबरून न जाता कुठलेही या आजाराचे लक्षण आढळल्यास मार्गदर्शन आणि उपचाराकरिता जवळच्या मनपा रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा,” असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी केले आहे.

अजून काही प्रक्रिया करायची असल्यास आरोग्य विभाग ती करेल.

“हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे होतो. त्यामुळे अशाप्रकारचे अन्न टाळावे, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे,” अशा सूचना फडणवीस यांनी आरोग्य विभागाला केल्या.

News Title: GBS-Alert-in-Mumbai-BMC-Prepares-150-ICU-Beds-After-Cases-in-Pune

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now