पुणे अपघात प्रकरणावर पहिल्यांदाच गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; रडत रडत म्हणाली….

On: October 7, 2025 7:16 PM
Gautami Patil Controversy
---Advertisement---

Gautami Patil Controversy | काही दिवसांपासून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) एका प्रकरणामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. प्रकरण घडल्यानंतर तब्बल एका आठवड्याने तिने मीडियासमोर येत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नेमके प्रकरण काय :

३० सप्टेंबर रोजी वडगाव बुद्रुक परिसरात गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या कारने रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले. त्यानंतर गौतमीला पोलिसांनी नोटीस बजावली. (Gautami Patil Controversy)

पुढे चौकशीनंतर पोलिसांना या घटनेत गौतमीचा कुठलाही संबंध न आढळल्याने त्यांनी गौतमीला क्लीन चिट दिली. मात्र, घटनेनंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेचा वर्षाव झाला. आता या सगळ्या प्रकरणावर तिने प्रतिक्रिया दिली असून माध्यमांसमोर अश्रूंनी मन मोकळं केलं.

Gautami Patil Controversy | “मला विनाकारण ट्रोल केलं, मी त्या गाडीत नव्हतेच” – गौतमी

पुण्यात (Pune) घेतलेल्या पत्रकार परिषदेत गौतमी पाटील म्हणाली, “गाडी माझी होती, पण त्या अपघाताच्या वेळी मी त्यात नव्हतेच. तरीही मला सोशल मीडियावर विनाकारण ट्रोल करण्यात आलं. गेल्या पाच दिवसांत माझा मानसिक छळ झाला आहे. ट्रोलिंग माझ्यासाठी नवीन नाही, पण एखाद्याची प्रतिमा मलीन करणं हे चुकीचं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.” ती भावनिक होत म्हणाली, “मी काही केलं नाही, तरी लोकांनी मला गुन्हेगार ठरवलं. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला.”

“अपघातानंतर माझा मानलेला भाऊ त्या कुटुंबीयांना भेटायला गेला होता. त्याने मदतीचा हात देखील पुढे केला होता. मात्र, कुटुंबियांनी कायद्यानुसार जाऊ, असे सांगितले आणि आमची मदत नाकारली”, असे गौतमी पाटील म्हणाली. “आता मीही कायद्यानुसारच उत्तर देणार आहे. माझी त्या कुटुंबीयांचीभेट घ्यायची इच्छा आहे, पण आधी माझी होत असलेली बदनामी थांबली पाहिजे.” (Gautami Patil Controversy)

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर गौतमीची प्रतिक्रिया :

गौतमी पाटीलचे वकील ॲड. हेमंत भांड पाटील म्हणाले, “गौतमीला हेतुपुरस्सर बदनाम केलं जात आहे. ज्यांनी तिच्या प्रतिमेला धक्का दिला, त्यांच्याविरुद्ध आम्ही कायद्यानुसार पावलं उचलू. मग ते कोणतेही राजकारणी असोत किंवा इतर.”

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पोलिसांना फोन करून “गौतमीला उचलायचं की नाही?” अशी विचारणा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर गौतमी म्हणाली,” दादांनी अशी भाषा वापरली. मला वाईट वाटलं. मला त्यांना काही बोलायचं नाही. या गोष्टीशी माझा संबंध येत नाही. फक्त गाडी माझी आहे एवढाच संबंध असल्याचे, गौतमी म्हणाली.

News Title : Gautami Patil Breaks Silence on Pune Accident Case

Join WhatsApp Group

Join Now